शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पोलिसांची आता सायकल पेट्रोलिंग

By admin | Updated: March 13, 2016 01:54 IST

शहरात ठेवणार वॉच, पोलीस अधीक्षकांची संकल्पना.

अकोला : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या सूचनेवरून तसेच पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या संकल्पनेतून शहरासाठी आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. शहरातील सात पोलीस कर्मचार्‍यांना सायकलीचे वितरण करण्यात आले असून, हे पोलीस कर्मचारी शहराच्या विविध भागात सायकलवर फिरून गैरकायदेशीर प्रकारांवर वॉच ठेवणार आहेत.पोलीस रस्त्यावर दिसावे, पोलीस आणि जनता यांच्यामध्ये संवाद वाढावा, या हेतूने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शनिवारी सायकल पेट्रोलिंग सुरू केली. रस्त्यावर फिरणार्‍या महिला, मुली यांना पोलीस शहराच्या प्रत्येक ठिकाणी हजर असल्याचे दिसावे. तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवून सामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम प्राथमिक स्तरावर शहरात राबविण्यात येत असून, लवकरच तो प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. सात सायकलींवर शनिवारपासून पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असून, या पेट्रोलिंगला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख जितेंद्र सोनवने, जिल्हा विशेष शाखाप्रमुख संजय खांडेकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.