शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

घरच्या मैदानावर अकोला पोलिसांचा ६-४ ने पराभव

By admin | Updated: June 8, 2015 01:28 IST

संतश्री गजानन महाराज चषक हॉकी स्पर्धेत यंगस्टार अमरावती विजेता.

अँड. नीलिमा शिंगणे / अकोला : घरच्या मैदानावर अकोला पोलीस संघाला यंग स्टार अमरावती संघाकडून ६-४ ने पराभव स्वीकारावा लागला. संतश्री गजानन महाराज चषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामना अकोला पोलीस मुख्यालय हॉकी मैदानावर रविवारी झाला. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्याचा निकाल अखेर टायब्रेकरमध्ये घेण्यात आला. अमरावती संघ सुरुवातीपासूनच आपसी ताळमेळ राखून खेळत होता. सामन्याच्या १८ व्या मिनिटाला अमरावतीच्या जावेद खान याने पेनॉल्टी कॉर्नरद्वारा गोल करू न संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी दुसर्‍या मध्यंतरापर्यंत होती. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला अकोल्याचा नवोदित खेळाडू अभिनंदन ठाकूर याने गोल करू न सामना बरोबरीत आणला. सामन्याच्या निर्धारित वेळेपर्यंत सामना १-१ ने बरोबरीत होता. अकोला संघाचा खेळ मध्यंतरात अतिशय संथ झाला. आपसी ताळमेळ नसल्याने लय चुकत होती. मैदानावरच एकमेकांची उणेदुणे काढण्यात अकोला संघाने वेळ घालविला. मात्र, शेवटच्या १५ मिनिटाला वेगवान खेळ केला होता. परंतु, त्याचा फारसा फायदा संघाला झाला नाही. अनेक चांगल्या संधी मिळाल्या. मात्र, सर्व निष्फळ ठरल्या. टायब्रेकरमध्ये अमरावती संघाच्या इर्शाद मिर्झाने पहिला गोल करू न संघाला परत आघाडी मिळवून दिली. अकोल्याची पहिली संधी वाया गेली. अमरावतीच्या शोएब खान याने गोल केला. यानंतर अकोल्याचा स्टार खेळाडू विजय झटाले याने गोल करू न स्थिती परत १-१ बरोबरीत आणली. अमरावतीच्या खालीद अहमदने संधीचे सोने केले. यानंतर अकोल्याचा अभिषेक पाठक याने गोल केल्याने पुन्हा स्थिती २-२ ने समान झाली. अमरावतीच्या वसीम सोहेल याने गोल करू न आघाडी मिळविली. या गोलची परतफेड अकोल्याच्या धीरज चव्हाणने करू न परत स्थिती ३-३ ने समान झाली. यामुळे प्रेक्षकांमध्ये विजेता कोण होते, याबाबत अधिकच उत्कंठा वाढली. अमरावतीच्या रिजवान खान याने गोल करू न संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर मात्र, अकोल्याच्या खेळाडूला नशीबाची साथ न लाभल्याने, अखेर सामना अमरावती संघाने ६-४ ने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सामन्यात पंच म्हणून रफीउद्दीन, आसिफ शेख, राजकुमार झां यांनी काम पाहिले.