शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 धनुर्विद्या स्पर्धेत अकोल्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:39 IST

अकोला आर्चरी अकादमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य अशी सात पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले.

अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा नुकत्याच झाल्या. अकोला आर्चरी अकादमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य अशी सात पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या या खेळाडूंचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाइचा, जि. धुळे येथे नुकत्याच २२ ते २७ आॅक्टोबर २०१९ पर्यंत धनुर्विद्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अकोला धनुर्विद्या संघटनेद्वारे सावित्रीबाई फुले कन्या शाळा अकोला येथे चालत असलेल्या अकोला आर्चरी अकादमीच्या खेळाडंूनी घवघवीत यश संपादित केले. दोन सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य अशी सात पदके मिळविली. या स्पर्धेत १४ वर्षे इंडियन राउंड मुलांमध्ये सूरज खानझोडे याने एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदके पटकावून महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक घेतला. आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच १९ वर्षे इंडियन राउंड मुलांमधून प्रेम भातारकरने सांघिक गटात एक सुवर्ण पदक तर १४ वर्षे कम्पाउंड राउंड मुलींमधून संचिता मोठे हिने सांघिक गटात एक रौप्य पदक व १४ वर्षे फिटा राउंड मुलींमधून ऋचा बोंडेने सांघिक गटात एक रौप्य पदकाची कमाई केली. जिल्हा प्रशिक्षक प्रणव नंदकिशोर बहादुरे व सहप्रशिक्षक राजेश्वर भांडे यांचे प्रशिक्षण तर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे प्रा. तुकाराम बिरकड, अ‍ॅड. विलास वखरे, शत्रुघ्न बिरकड, राजेंद्र जळमकर यांचे मार्गदर्शन लाभले. अकोला रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन होताच जिल्ह्यातील धनुर्विद्या खेळाडू व पालकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी धनुर्विद्या खेळाडू कंजल पवरे, गार्गी पागृत, श्रेयश भोकर, हिमांशू देशमुख,राजाश्रीशाहु कांबळे, शिव ढवळे, अभय अहिर, हेरंभ सूर्यवंशी, आराध्य मते यांच्यासह पालक अतुल पवरे, उज्ज्वल पागृत, ज्ञानसागर भोकरे, दीपक सूर्यवंशी, अविनाश मते व नंदकिशोर बहादुरे उपस्थित होते. 

टॅग्स :Akolaअकोला