शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे मंगळवारी

By admin | Updated: July 1, 2017 01:13 IST

खा. धोत्रे यांचा पाठपुरावा : अकोला-वाशिमच्या भाविकांची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला व वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्यावतीने मंगळवार, ३ जुलै रोजी अकोला ते पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे सोडण्यात येणाऱ्या या विशेष रेल्वेगाडीचा फायदा मतदारसंघातील वारकरी व शेतकऱ्यांना होणार आहे. अमरावती ते पंढरपूर ही रेल्वे गाडी तीन वर्षांपूर्वी आरंभ झाली. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातील माना ते शेगाव परिसरातील वारकऱ्यांची सोय झाली; परंतु अकोला - वाशिम या परिसरातील व मतदारसंघातील रिसोड-मालेगाव या भागातील वारकऱ्यांना पूर्णा किंवा परळी जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन खासदार संजय धोत्रे यांनी दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे सहा महिन्यांपासून या विभागामधून विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा तगादा लावला होता. या अनुषंगाने ३ जुलै १७ रोजी अकोला येथून गाडी क्र.७५२३ अकोला ते पंढरपूर रात्री ८ वाजून १० मी. सुटणार आहे, तर पंढरपूरवरून ५ जुलै १७ रोजी गाडी क्र. ७५२४ सायंकाळी ६ वाजून ४० मी. निघणार आहे. शिवणी, बर्शीटाकळी, वाशिम, पूर्णा परळी, परभणी या मार्गे ही रेल्वे गाडी जाणार असून, या गाडीला ८ जनरल डब्बे, २ स्लिपर कोच लावण्यात येणार आहेत. तसेच नांदेड - पंढरपूर व नगरसोल ते पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडीसुद्धा सुटणार आहे. यामुळे पश्चिम विदर्भ, मराठवाडा या भागातील यात्रेकरूंना कमी दरात सोय होणार आहे.