शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अकोला :  शहरातील मालधक्का तत्काळ हटविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 10:11 IST

शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या या मालधक्क्याचा सर्वांनाच त्रास होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रवासी रेल्वेस्थानकातील मालधक्का बंद करण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वीच दिल्याने आता तातडीने इतरत्र न हलविल्यास कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक, अकोला स्टेशन प्रबंधकांना सोमवारी दिलारेल्वेस्थानकात दैनंदिन येणाºया रॅकद्वारे किमान १,२०० ते १,३०० टन मालाची चढ-उतार केली जाते. हा माल उतरणे आणि वाहनांमध्ये भरण्यासाठी ४०० ते ५०० माथाडी कामगारही लागतात. तसेच माल इतर ठिकाणी पोहचवण्यासाठी किमान ५० ते १०० ट्रकची ये-जा या ठिकाणी होते. शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या या मालधक्क्याचा सर्वांनाच त्रास होत आहे.ही बाब लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा दंडाधिकारी म्हणून आदेश पारित केला होता. त्यासाठी त्यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी सर्वसंबंधितांची बैठक घेतली.त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाला सातत्याने निर्देश देऊनही मालधक्का इतर ठिकाणी हलविला नसल्याने ३१ मार्च २०१९ पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली. त्या मुदतीत कोणत्याही परिस्थितीत मालधक्का शहरातून हटवावा, असे निर्देश दिले.सोबतच रेल्वे मालधक्का कोणत्याही परिस्थितीत शहरात योग्य नाही, असेही मत नोंदवले. मालधक्का न हटविल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला; मात्र त्या आदेशालाही केराची टोपली दाखवत रेल्वेस्थानकातील मालधक्का सुरूच ठेवण्यात आला. त्यातून जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलनाही रेल्वे प्रशासनाने केली.

आता वाहन उभे असले तरी कारवाई होणार! तत्कालीन जिल्हादंडाधिकाºयांनी दिलेल्या आदेशात ३१ मार्च नंतर त्या ठिकाणी माल वाहतूक करणारे कोणतेही वाहन उभे दिसल्यास ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी, रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे, तसेच अप्रिय घटना घडल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होेते. आता जिल्हाधिकारी पापळकर यांनी त्याच आदेशानुसार मालधक्का तत्काळ न हटवल्यास कारवाई करण्याचे बजावले आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीलाही ठेंगा विशेष म्हणजे, जिल्हाधिकाºयांनी प्रतिबंध केला असतानाही पोलीस, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाने या कालावधीत मालधक्क्यावर येत असलेल्या कोणत्याही वाहनावर कारवाई केली नाही. यावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री बच्चू कडू यांनीही मालधक्का बंद करण्याचा आदेश सातत्याने दिला. त्यांच्या आदेशालाही सर्व संबंधित यंत्रणांनी धाब्यावर बसवण्याचा प्रकार घडला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक