शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Akola: एनएचएम कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत केले अनाेखे आंदाेलन, कॅंडल मार्च काढण्याची तयारी

By सचिन राऊत | Updated: November 6, 2023 18:39 IST

Akola News: शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

- सचिन राऊत  अकोला - शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदाेलनाच्या १३ व्या दिवशी साेमवारी आंदाेलनस्थळी एनएचएमच्या २० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. आता कॅंडल मार्च काढण्याची तयारी आंदाेलनकर्त्यांनी केली आहे.

राष्ट्रीय आराेग्य अभियान अधिकारी-कर्मचारी गत १३ दिवसांपासून आंदाेलन करीत असताना शासन दखल घेत नसल्याने यावेळी काही कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत अनाेखे आंदाेलन केले. या आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी- कर्मचारी सहभागी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, जीएनएम एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनएचएमअंतर्गत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्तपदांवर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. याची दखल न घेतल्याने २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत कृती समितीने घोषणा दिल्या व आंदोलन केले. १३ दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आंदाेलन करीत असताना शासन दखल घेत नसल्याने यावेळी काही कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आंदाेलन केले. यावेळी राष्ट्रीय आराेग्य अभियानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदाेलनाला आराेग्य संस्थांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोला