शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नेकलेसवरील ‘रेड मार्किंग’ला व्यावसायिकांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 12:35 IST

अकोला : नेकलेस रोडच्या रुंदीकरणाला जाणीवपूर्वक विलंब केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देया रोडवरील मोठ्या व्यावसायिकांनी मनपाच्या ‘रेड मार्किंग’ला ठेंगा दाखविल्याचे चित्र समोर आले आहे. मूळ इमारतीच्या अतिक्रमणाला कोणीही हात लावला नसल्याचे दिसून येत आहे. भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला खोळंबा निर्माण होऊन रस्त्याचे काम पुन्हा थंड बस्त्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.

अकोला : नेकलेस रोडच्या रुंदीकरणाला जाणीवपूर्वक विलंब केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण व महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा उचलत या रोडवरील मोठ्या व्यावसायिकांनी मनपाच्या ‘रेड मार्किंग’ला ठेंगा दाखविल्याचे चित्र समोर आले आहे. थातूरमातूर दुकानांचे ओटे, पायऱ्या, गॅलरी पाडल्यानंतर मूळ इमारतीच्या अतिक्रमणाला कोणीही हात लावला नसल्याचे दिसून येत आहे. अर्थात, या अतिक्रमणामुळे आगामी दिवसांत भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला खोळंबा निर्माण होऊन रस्त्याचे काम पुन्हा थंड बस्त्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.शहरातील विकास कामांसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना प्राप्त २५ कोटींच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्या टप्प्यात १८ कोटींतून होणाºया कामांच्या निविदा प्रकाशित केल्या. त्यामध्ये नेहरू पार्क चौक ते सिव्हिल लाइन चौक तेथून रतनलाल प्लॉट चौक ते दुर्गा चौक अशा १ हजार १२० मीटर लांब नेकलेस रस्त्यासाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कंत्राटदाराची निविदा मंजूर होऊन आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे, हे येथे उल्लेखनीय. ‘डीपी प्लॅन’नुसार नेकलेस रस्त्याची रुंदी २३ ते काही ठिकाणी २२, २१ मीटर अंतराची असल्याची माहिती आहे. रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूंच्या मालमत्ताधारकांनी निर्माण केलेले अतिक्रमण दूर करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत नगररचना विभागाने मालमत्तांची मोजणी करून इमारतींवर ‘रेड मार्किंग’ केली होती. त्यावर संबंधित मालमत्ताधारकांनी ‘रेड मार्किंग’नुसार इमारतींचा भाग हटविणे अपेक्षित होते. बोटावर दोन-चार मालमत्ता वगळल्यास इतर व्यावसायिकांनी थातूरमातूर दुकानांचे ओटे, पायºया व गॅलरी आदी भाग तोडण्याचा देखावा केला आहे. मार्किंगपर्यंतचा भाग तोडणे अपेक्षित असताना काही मोठ्या व्यावसायिकांनी प्रशासनाच्या मार्किंगला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे.

मनपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह रस्ता रुंदीकरणासाठी मनपा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन इमारतींचे अतिक्रमण हटविणे अपेक्षित आहे. आजपर्यंत मनपाच्या नगररचना विभागाने व अतिक्रमण विभागाने कोणत्या इमारतीचे अतिक्रमण स्वत: हटविले, याचा खुलासा करण्याची गरज आहे. अर्थात, मालमत्ताधारकांवर विश्वास असल्याने मनपाने कारवाई केली नसेल, तर असाच विश्वास शहरातील इतरही मालमत्ताधारकांवर मनपा दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित होऊन मनपाची भूमिका संशयाच्या घेºयात सापडली आहे.  

काम थंड बस्त्यात; राजकीय किनारशहरातील बहुतांश रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहेत. सदर कामे होत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. नेकलेसच्या रखडलेल्या रुंदीकरणाला भाजपमधील अंतर्गत राजकारणाची किनार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळेच मनपासह महावितरण कंपनीकडून प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी चालढकल केली जात असल्याची माहिती आहे. 

खांब हटविल्याशिवाय रुंदीकरण कसे?रस्त्यालगतचे विद्युत खांब, रोहित्र हटविल्याशिवाय रस्त्याचे रुंदीकरण शक्यच नाही. तरीही ‘पीडब्ल्यूडी’ने रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयांकडून दिले जात आहेत. रस्त्याचे काम सुरू झाल्यावर विद्युत खांबांचा अडथळा कायम राहिल्यास रुंदीकरणाच्या कामाला खीळ बसेल, नेमकी हीच बाब हेरून घाईघाईत रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. या गंभीर विषयाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका