शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस

By admin | Updated: December 31, 2014 00:56 IST

घनकच-याचे व्यवस्थापन; २५ टक्के निधीची तरतूद नाही.

अकोला : शहरातील घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मनपा प्रशासनाने अर्थसंकल्पात २५ टक्के निधीची तरतूद न केल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वारंवार सूचना देऊनही मनपा निर्णय घेत नसल्याने आयुक्त व महापौरांवर खटला दाखला करण्याचा गर्भित इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला असून, यासंदर्भातील नोटीस प्रशासनाला मंगळवारी प्राप्त झाली.शहरातील सांडपाण्यापैकी ८0 टक्के सांडपाणी सोडून प्रदूषणाला हातभार लावणार्‍या महापालिकांच्या ढिसाळ कारभाराला चाप लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने पत्रव्यवहार केला जातो. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपाने अर्थसंकल्पात २५ टक्के निधीची तरतूद करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने सप्टेंबर महिन्यात प्रशासनाला दिले होते. त्यानुषंगाने मनपाने अर्थसंकल्पात २५ टक्के निधीची तरतूद करणे क्रमप्राप्त होते. यासंदर्भात प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविणे आवश्यक असताना तसे झाले नाही. यामुळे येत्या पंधरा दिवसांत निधीच्या तरतुदीबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट न केल्यास आयुक्त व महापौर यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसमध्ये दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी डंम्पिंग ग्राऊंडची नितांत आवश्यकता आहे. शहरानजिकच्या भोड ग्रामपंचायत हद्दीपासून दोन किलो मिटर लांब अंतर असलेल्या जागेची निवड करण्यात आली असली तरी ग्रामपंचायतने जागा देण्यास नकार दिला आहे.पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा मुद्दा समोर आला असता,यावर तोडगा काढण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले. भूमिगत गटार योजना मार्गी लागल्यास सांडपाण्याची समस्या आपसुकच निकाली निघेल. प्रदूषण मंडळाच्या नोटीसला उत्तर देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे मनपा उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांनी स्पष्ट केले.