शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिका कर्मचारी पुन्हा संपावर?

By admin | Updated: May 28, 2014 22:00 IST

संघर्ष समितीने दिला प्रशासनाला इशारा

अकोला : महापालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, कालबद्ध पदोन्नती, थकीत वेतन आदी विविध मुद्यांवर पुन्हा एकदा मनपा कर्मचारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. संघर्ष समितीच्या मागण्यांवर सकारात्मक विचार न केल्यास येत्या ४ जूनपासून संप पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. मनपातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचार्‍यांना अद्यापही पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करण्यात आली नाही. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना ही रक्कम देय करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आजारी कर्मचार्‍यांना उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. कालबद्ध पदोन्नतीसह थकीत वेतनाची समस्या कायम आहे. शहरात साफसफाईची कामे करण्यासाठी मनपाच्या आस्थापनेवरील उपलब्ध कर्मचारी संख्या पुरेसी नसल्याने किमान ३०० कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे गरजेचे झाले आहे. कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे, याबाबीचा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर प्रशासनाला ४ कोटींचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले होते. सदर अनुदानातून पाचव्या वेतनाची समस्या निकाली निघण्यास मदत होईल. यामुळे या विषयावर प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा ४ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा मनपा कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. ** एलबीटीच्या उत्पन्नात वाढ नाहीच!२० एप्रिल ते २० मेपर्यंत स्थानिक संस्था कर विभागाला ३ कोटी ५८ लाख रुपये प्राप्त झाले. मार्च महिन्यात हीच वसुली ४ कोटी २० लाखापर्यंत पोहोचली होती. एलबीटी रद्द होण्याच्या शक्यतेने व्यापार्‍यांमध्ये निरुत्साह आहे. तर ही बाब एलबीटी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पथ्यावर पडत आहे. एका कर्मचार्‍याला गुटखा विके्रत्यांकडून किमान ४० हजारांचा हप्ता प्राप्त होत असल्याची माहिती आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यात आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना सपशेल अपयश आल्याचे चित्र आहे.