शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराच्या कंत्राटात ‘अर्थकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 10:33 IST

महिला बचत गटांना डावलण्यामागे अर्थकारणाची किनार असल्याची माहिती आहे.

अकोला: महापालिक ा तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून होणारा शालेय पोषण आहार पुरवठ्याचा कंत्राट रद्द करून २०१९-२० च्या शालेय सत्रापासून केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी जारी केला. २६ जून रोजी शाळेची घंटा वाजल्यानंतरही अद्यापपर्यंत मनपा प्रशासनाने पुरवठादार निश्चित केला नसून, महिला बचत गटांना डावलून विशिष्ट एजन्सीला कंत्राट देण्याचा रेटा लावून धरणारी मनपा उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती वादाच्या भोवºयात सापडली आहे. महिला बचत गटांना डावलण्यामागे अर्थकारणाची किनार असल्याची माहिती आहे.जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने शालेय पोषण आहार पुरवठा सुरू केला. स्वायत्त संस्थांच्या स्तरावर दरवर्षी निविदा प्रक्रिया रावबून महिला बचत गटांना आहार पुरवठ्याचे कंत्राट दिले जात होते. यादरम्यान, २०१९-२० या शालेय वर्षात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केला. सुरुवातीला शासन स्तरावर नियुक्त केलेल्या संस्थेच्यावतीने आहाराचा पुरवठा केला जाणार होता. ही प्रक्रिया थंड बस्त्यात सापडल्यामुळे शिक्षण विभागाने महापालिकेच्या स्तरावर निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, तीन एजन्सीचे अर्ज पात्र ठरवले आहेत.एकत्र आल्यास अडचण काय?केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीसाठी संबंधित पुरवठादार किंवा महिला बचत गटांची आर्थिक उलाढाल ४० लक्ष रुपये असण्याची अट आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील अनेक महिला बचत गटांनी एकत्र येऊन आर्थिक निकषाची अट पूर्ण केली. तरीही प्रशासन बचत गटांना डावलून एजन्सीला कंत्राट देण्यासाठी आग्रही का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

महिला बचत गटांना डावलले?जिल्हा परिषद तसेच मनपा प्रशासनाने जुन्या किंवा नवीन महिला बचत गटांना पोषण आहाराचा कंत्राट देऊ नये, असे शिक्षण संचालकांचे निर्देश होते. त्यामुळे केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणालीचा कंत्राट बचत गटांना मिळणार किंवा नाही, यावरून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. तूर्तास बचत गटांची क्षमता ओळखून त्यांनाही संधी देण्यात यावी, असे शिक्षण संचालकांचे स्पष्ट निर्देश आहेत. तरीही मनपाच्या समितीने बचत गटांना डावलल्याचे समोर आले आहे.शालेय पोषण आहाराच्या कंत्राटसंदर्भात शिक्षण संचालकांचे काय निर्देश आहेत, याची पडताळणी करून योग्य निर्णय घेतला जाईल. तसे निर्देश उपायुक्तांसह शिक्षण विभागाला दिले जातील.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका