शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अल्पसंख्याक मतांसाठी अकोला मनपाच्या महापौर पदाची ‘ऑफर’!

By admin | Updated: September 4, 2014 01:28 IST

अल्पसंख्याक समाजाच्या गठ्ठा मतांसाठी मुस्लीम समाजास महापौर पद देण्याच्या हालचाली सुरू.

अकोला : विधानसभेच्या अकोला पश्‍चिम मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाच्या गठ्ठा मतांसाठी मुस्लीम समाजास महापौर पद देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदासंघावर ताबा मिळविण्यासाठी ही राजकीय खेळी खेळण्यात येत आहे. या खेळीमुळे अकोला पश्‍चिमची उमेदवारी मुस्लीम अ थवा मुस्लिमेतर उमेदवारास मिळाली आणि अल्पसं ख्याकांसोबतच इतर समाजाच्या मतांची मोट बांधण्यास कॉँग्रेसला यश आले तर, जिल्ह्यातील राजकीय समीकरणच बदलतील, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत अकोला पश्‍चिम मतदारसंघात भाजपचे खा. संजय धोत्रे यांना ७२ हजार ८३ तर कॉँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना ५७ हजार ३८0 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांना अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक समाजातील मते खेचण्यात यश आल्याचेही मतांवर नजर टाकल्यास दिसून येते; मात्र इतर समाजाची मतं भाजपच्या तुलनेत कॉँग्रेसला कमी मिळाली होती.अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात नेहमीच जात, धर्माच्या आधारे मतदान होते. या ठिकाणी होणार्‍या प्र त्येक निवडणुकीत मूलभूत सुविधा, विकासाच्या मुद्याला बगल दिली जाते. त्यामुळे दीड दशकांपासून परिसराचा विकास खुंटला आहे. पश्‍चिम मतदारसंघात हिंदू, मुस्लीम, दलित मतदारांचे कमी जास्त प्रमाणात प्राबल्य आहे. विधानसभा मतदारासंघाचे नेतृत्व भाजपकडे असले तरी मनपामध्ये कॉँग्रेस आणि भारिप-बमसंची सत्ता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप, कॉँग्रेस आणि भारिप-बमसंच्या उमेदवारांना समान संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी आता राजकीय खेळी खेळण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला पश्‍चिम म तदारसंघासाठी कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून सामाजिक समीकरणाचाही विचार करण्यात येत आहे. यंदा गैरमुस्लीम उमेदवार दिल्यास अल्पसंख्याक समाजातील मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी पक्षातील स्थानिक पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. म्हणूनच १0 सप्टेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार असून, या पदाची माळ मुस्लीम नगरसेवकाच्या गळयात टाकली, तर अल्पसंख्याक मतं गैरमुस्लीम उमेदवारास मिळू शकतात का, या दिशेने विचार सुरू आहे. महापालिकेमध्ये विविध पक्षांचे एकूण १९ मुस्लीम नगरसेवक आहेत. अल्पसं ख्याक समाजातील नेते आणि सर्व मुस्लीम नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन मते खेचता येतील काय, या दिशेने विचार करण्यात येत आहे. *अल्पसंख्याक मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर..अल्पसंख्याक आणि कॉँग्रेसच्या पारंपरिक मतांचे विभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडत असल्याचे २00९ च्या निवडणुकीतील निकालावर नजर टाकल्यास दिसून येते.

उमेदवार                                  मिळालेली म तेगोवर्धन शर्मा (भाजप) : -           ४४ हजार १५६रमाकांत खेतान (काँग्रेस) :-         ३२ हजार २४६अजहर हुसेन (जनसुराज्य पक्ष) :- २३ हजार ६0सज्जाद हुसेन (भारिप-बमसं) :-    ११ हजार ९0९अब्दुल मुनाफ (यूडीफ) :-             १ हजार ५७८नकीर खान (सपा) :-                   २ हजार ७५३लतिफ शाह सिद्धिकी (अपक्ष) :-                २६३सलीम दक्तर (अपक्ष) : -                        ८४१*१८ पैकी ४ उमेदवारांवरच पक्षश्रेष्ठींकडून चर्चाजिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर पाच मतदारसंघांसाठी एकूण ७२ इच्छुकांचे अर्ज जिल्हा कॉँग्रेस कमिटीने प्रदेश कार्यालयात सादर केले होते. अकोला पश्‍चिम म तदारसंघासाठी १८ अर्ज प्राप्त झाले होते. काही नेत्यांनी थेट मुंबई प्रदेश कार्यालयात अर्ज सादर केले होते. १७ ऑगस्ट रोजी इच्छुकांच्या सामूहिक मुलाखती कॉँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीनं तर अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीनंतर प्रत्येक मतदारसंघासाठी तीन इच्छुक उमेदवारांचे पॅनल तयार करण्यात आले. अकोला पश्‍चिम मतदासंघातील पॅनलमध्ये मात्र ४ इच्छुकांचा समावेश आहे. या चार जणांमध्ये एक अल्पसंख्याक आणि तीन हिंदू उमेदवारांचा समावेश आहे. पॅनलमध्ये एक महिला नगरसेविकाही आहे.