शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घराकडे मनपाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 11:11 IST

Akola Municipal Corporation : निर्जंतुकीकरण करण्याला मनपा प्रशासनाने ठेंगा दाखवल्यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे.

अकाेला : शहरात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्या गृहभेटीकडे महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेने पाठ फिरवल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची आराेग्य तपासणी करणे, घराचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याला मनपा प्रशासनाने ठेंगा दाखवल्यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे. मनपाची आराेग्य यंत्रणा ताेकडी असल्यामुळे झाेन अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक हाेत आहे.

शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा कोरोना बाधित रुग्णांचा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सतर्क होऊन रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापासून ते संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या इत्थंभूत माहितीची नोंद ठेवण्याची गरज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णाची माहिती प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने मलेरिया विभागाला पूर्वसूचना देऊन फवारणीसाठी पथके रवाना करणे, बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असताना या विभागाची यंत्रणा ताेकडी पडत असल्यामुळे समस्यांचे निराकरण हाेत नसल्याचे दिसत आहे. शहरात काेराेनाबाधितांची संख्या वाढत चालली असल्यामुळे नागरिकांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.

 

रुग्णसंख्या वाढली !

मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख मागील अनेक दिवसांपासून आजारी रजेवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे डाॅ. अस्मिता पाठक यांच्याकडे प्रभार साेपविण्यात आला असून त्यादेखील आजारी आहेत. अशावेळी अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी इमानेइतबारे कामकाज करीत आहेत. या विभागाकडे शहरातील पाॅझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी उपलब्ध असली, तरी त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत असल्यामुळे मनपाची यंत्रणा सैरभैर झाली आहे.

 

झाेन अधिकारी तणावात

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यापासून काेराेनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे. वर्तमानस्थितीत शासकीय असाे वा खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यांत प्रादुर्भाव वाढल्याचे पाहून मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी झाेन अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे. काेराेनाचा वाढता प्रसार पाहता काही झाेन अधिकारी तणावात असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या