शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिका: राज्य शासनाकडे १०० कोटींचा प्रस्ताव धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:52 IST

अकोला: हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी राज्य शासनाने १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला.

ठळक मुद्दे मु ख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मनपा प्रशासनाने या भागातील विकास कामांचे ६१० प्रस्ताव तयार क रीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. या प्रस्तावाला नगर विकास विभागाकडून हिरवी झेंडी मिळत नसल्याचे चित्र आहे.

अकोला: हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी राज्य शासनाने १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला. त्यानुषंगाने महापालिका प्रशासनाने विकास कामांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला. या प्रस्तावावर शासनाने अद्यापही निर्णय न घेतल्यामुळे प्रत्यक्षात कामाला विलंब होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यादरम्यान, १०० कोटींच्या कामांमध्ये मनपाला २० टक्के आर्थिक हिस्सा जमा करणे शासनाने अनिवार्य केले आहे.शहरालगतच्या २४ गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्यामुळे मनपा प्रशासनाने शासनाकडे हद्दवाढीची मागणी रेटून धरली होती. तत्कालीन ग्रामपंचायतींमध्ये ले-आउट नसल्यामुळे रस्ते, नाल्या, सर्व्हिस लाइन, पथदिव्यांसह पाणीपुरवठा आदी सुविधांची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला. त्यापैकी मु ख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मनपा प्रशासनाने या भागातील विकास कामांचे ६१० प्रस्ताव तयार क रीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. जिल्हाधिकाºयांनी यापैकी ५९० प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आले. या प्रस्तावाला नगर विकास विभागाकडून हिरवी झेंडी मिळत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींसह महापौर विजय अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.मनपाचा आर्थिक हिस्सा; अट नाकारली!महापालिका प्रशासनाने नुकतीच मालमत्तांची ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मोजणी केली. त्यामुळे उत्पन्नाचा आकडा १८ कोटींवरून थेट ५० कोटींच्या घरात गेला. ही वसुली अद्याप व्हायची असल्याने व मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने राज्य शासनाने १०० कोटींच्या प्रस्तावात मनपाचा २० टक्के आर्थिक हिस्सा जमा करण्याची अट रद्द करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह महापौर विजय अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती. ही अट शासनाने नाकारल्यामुळे मनपाला टप्प्याटप्प्याने का होईना, आर्थिक हिस्सा जमा करावा लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका