शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

अकोला महापालिकेची अखेर हद्दवाढ!

By admin | Updated: August 31, 2016 03:00 IST

शासनाने जारी केली अधिसूचना

अकोला, दि. ३0 : पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर मंगळवारी अकोला महापालिकेची हद्दवाढ झाली. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नगर विकास विभाग व ग्राम विकास विभागाने तशी अधिसूचना जारी केली. महापालिकेच्या हद्दवाढीचे घोंगडे मागील पंधरा वर्षांपासून भिजत पडलेले होते. अकोला महानगरपालिका २00१ मध्ये हद्दवाढ न करताच अस्तित्वात आली होती. त्यामुळे प्रारंभी महापालिकेचे नाव अकोला शहर महापालिका असे होते. पुढे नावातून शहर शब्द वगळण्यात आला; मात्र हद्द होती तेवढीच राहिली. पालिकेचे तत्कालीन प्रशासक अनुपकुमार यांनी २00२ मध्येच मनपा हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यामध्ये शहरालगतच्या २१ गावांचा समावेश करण्यात आला. विद्यमान महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ऑक्टोबर २0१६ मध्ये हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव सादर केला. त्यामध्ये २४ गावे प्रस्तावित करण्यात आली. सध्या २८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या अकोला शहराची लोकसंख्या २0११ च्या जनगणेनुसार ४ लक्ष २७ हजार एवढी आहे, तर मनपात नव्याने समाविष्ट केलेल्या २४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९६.४ चौरस किलोमीटर असून संबंधित गावांची लोकसंख्या १ लक्ष १२ हजाराच्या आसपास आहे. हद्दवाढीनंतर शहराचे क्षेत्रफळ १२४.४ चौरस किलोमीटर होणार असून महसुली उत्पन्नात मात्र केवळ ४ कोटीची भर पडणार आहे. मे महिन्यात हद्दवाढीच्या हरकती व सूचना निकाली काढल्यानंतर, शासन दरबारी प्रशासकीय कामकाजाला वेग आला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हद्दवाढ होईल, असे अपेक्षित होते. यादरम्यान, अचानक सोमवारी (२९ ऑगस्ट) रात्री हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर मंगळवारी नगर विकास विभाग व ग्राम विकास विभागाने हद्दवाढीची अधिसूचना जारी केली.