शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Akola Municipal Corporation : ५३ दिवसांत १२१ काेटींच्या टॅक्स वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 10:03 IST

Akola Municipal Corporation : ३१ मार्चपर्यंत ही थकीत रक्कम वसूल हाेइल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अकाेला : महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्राेत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीला खाेळंबा निर्माण झाला आहे. मागील आठ महिन्यांत वसुली निरीक्षकांनी ४४ काेटींचा टॅक्स वसूल केला असला, तरी पुढील ५३ दिवसांत १२१ काेटींच्या वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. ३१ मार्चपर्यंत ही थकीत रक्कम वसूल हाेइल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्य शासनाकडून प्राप्त विकास निधीत आर्थिक हिस्सा जमा करण्याच्या उद्देशातून व कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला हाेता. मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी ‘जीपीएस’प्रणालीचा वापर करण्यात आला हाेता. २०१५ पर्यंत मनपाच्या मालमत्ता विभागाच्या दप्तरी कागदाेपत्री ७२ हजार मालमत्तांची नाेंद हाेती. यापासून मनपाला अवघे १६ ते १८ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळत हाेते. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर ही संख्या १ लाख ४४ हजार असल्याचे समाेर आले. १९९८ नंतर मनपाने प्रथमच २०१६ मध्ये मालमत्ता कराच्या रकमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असता, सुधारित दरवाढीनुसार ६८ ते ७० काेटी रुपये जमा हाेइल, असा अचूक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला हाेता. परंतु करवाढीचे प्रकरण न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्याने अकाेलेकरांनी कर जमा करण्यास हात आखडता घेतला. त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला आहे.

...तर वेतनाची समस्या निर्माण हाेइल!

मनपा कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी प्रशासन व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना २०१० मध्ये शासनाकडे हात पसरावे लागले होते. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेतनासाठी १६ कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. या रकमेची अद्यापही परतफेड सुरू आहे. यंदा टॅक्सची वसुली न झाल्यास सत्ताधारी भाजपला निधीसाठी राज्य सरकारकडे हात पसरण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

 

मनपासमोर १२१ कोटींचे उद्दिष्ट

सुधारित करवाढ केल्यानंतर गतवर्षीचे ७० कोटी व थकीत ५५ अशा एकूण १२५ कोटींतून मनपाच्या टॅक्स विभागाने २०१९-२० मध्ये ३० कोटींचा कर वसूल केला. अर्थात मनपासमोर ९५ कोटींची थकबाकी व चालू आर्थिक वर्षातील ७० कोटी अशा एकूण १६५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट हाेते. यापैकी ४४ काेटी वसूल झाले असून, १२१ काेटींच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोलाTaxकर