शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

अकोला महापालिकेची शहर बस सेवा तोट्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 13:53 IST

सिटी बसला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून बस वाहतूक सेवा तोट्यात सुरू असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसचा करार केला.सद्यस्थितीत २० पैकी १८ बस शहरात धावत आहेत. अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.

- आशिष गावंडे

अकोला: सत्ताधारी भाजपासह महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करून अकोलेकरांच्या सुविधेसाठी शहर बस वाहतूक सुविधा सुरू केली. बस सेवेचा कंत्राट श्रीकृपा ट्रॅव्हल्सला देण्यात आला. सिटी बसला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून बस वाहतूक सेवा तोट्यात सुरू असल्याचे समोर आले आहे. उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळवणे कंपनीला शक्य होत नसल्यामुळे कंपनीकडून बॅटरीवर चालणाºया वाहनांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.मनपाची स्थापना झाल्यानंतर २००४ मध्ये तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेने शहरात पहिल्यांदा बस सेवेची मुहूर्तमेढ रोवली होती. या बस सेवेला २०१३ पर्यंत घरघर लागली आणि भंगार झालेल्या बसेसला अपघात होण्याच्या भीतीने तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-भारिप-बमसंने ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे चार वर्ष सिटी बस बंद होती. २०१४-१५ मध्ये मनपात सत्तापरिवर्तन होताच पुन्हा भाजपने सिटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसचा करार केला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बसेस सुरू करण्यात आल्या. जानेवारी २०१८ मध्ये आणखी पंधरा बसेस शहरात दाखल झाल्या. सद्यस्थितीत २० पैकी १८ बस शहरात धावत आहेत. यादरम्यान, सिटी बस सेवेला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उर्वरित नवीन पंधरा बसची खरेदी करण्यापूर्वी कंपनीने बॅटरीवर चालणाºया वाहनांची शोध मोहीम सुरू केल्याची माहिती आहे.शालेय विद्यार्थी, कर्मचाºयांना ५० टक्के सुटशहर बस सेवेला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या धर्तीवर श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय-निमशासकीय सेवेतील कर्मचाºयांना तिकिटाच्या दरातून ५० टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्पन्न कमी अन् खर्च जास्तशहरातील प्रमुख रस्त्यांवर १८ बसेस धावत आहेत. सर्व बसेस मिळून कंपनीला दैनंदिन ७३ ते ७६ हजार रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. दोन शिफ्टमध्ये काम करणाºया १६० चालक-वाहकांच्या वेतनावर प्रतिदिन ४८ हजार रुपये खर्च होत असून, इंधनासाठी दररोज ४८ ते ५० हजार रुपये मोजावे लागत असल्याची माहिती आहे. कार्यालयीन इतर कर्मचाºयांच्या वेतनाचा खर्च यापेक्षा वेगळा आहे.मागील अनेक महिन्यांपासून सिटी बस सेवा तोट्यात सुरू आहे. अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्यामुळे कर्मचाºयांचा खर्चही भागवणे मुश्कील झाले आहे. पुढील १५ बसेस खरेदी करण्यापूर्वी महापौर, मनपा आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा केली जाईल. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नरत आहे.-राजेश माने, संचालक, श्रीकृपा ट्रॅव्हल्स.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका