शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाचे २४0 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

By admin | Updated: July 10, 2014 01:29 IST

विशेष सभेत महापौरांची हिरवी झेंडी; १५ कोटी ९४ लाखांच्या शिलकीचे अंदाज पत्रक

अकोला : महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सन २0१४-१५ या आर्थिक वर्षाचा १५ कोटी ९४ लाखांच्या शिलकीसह २४0 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये ८ कोटींची वाढ सुचवित २४0 कोटींच्या अर्थसंकल्पाला महापौर ज्योत्स्ना गवई यांनी बुधवारी विशेष सभेत मंजुरी दिली. विशेष म्हणजे, स् थायी समिती अस्तित्वात नसल्यामुळे हा अर्थसंकल्प प्रशासनाने थेट विशेष सभेत सादर केला.मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केवळ आकडे मोठे करण्यासाठी फुगवून अर्थसंकल्प सादर करण्यापेक्षा संभाव्य प्राप्त उत्पन्नाच्या बाबी विचारात घेत, उत्पन्न व खर्चाचा हिशेब मांडला. त्यांनी अकोलेकरांवर कोणताही नवीन कर लादला नाही. महापालिकेला एलबीटीचा (स्थानिक संस्था कर) फटका बसल्याचे प्रशासनाने कबूल केले. त्यामुळे उत्पन्नाचा आलेख काहीअंशी घसरला. सन २0१४-१५ चे पहिल्या चार महिन्याकरिता ३५ कोटी ३0 लाख ५२ हजारचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत लेखा अनुदान मंजूर करीत मनपाचे दैनंदिन कामकाज सुरू असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. मार्चच्या शेवटपर्यंत एलबीटीपासून ५५ कोटी रुपये उत्पन्न होण्याची शक्यता आयुक्तांनी वर्तविली. आयुक्त कल्याणकर यांनी अर्थसंकल्प सादर करताना अप्रत्यक्षपणे फुगीर अर्थसंकल्प सादर करणार्‍या सत्ताधार्‍यांवर नेम साधला. आयुक्त म्हणाले, आपण पुढील वर्षीचे उत्पन्न विचारात घेऊनच नियोजन केले आहे. उत्पन्नात वाढ कमी आहे. त्यामुळे आपण अ र्थसंकल्पात वस्तुस्थिती दर्शविली, असे सांगत आयुक्तांनी अप्रत्यक्षपणे अवास्तव अर्थसंकल्प मांडणार्‍या सत्तापक्षाला चिमटे काढले. ह्यजीआयएसह्ण प्रकल्पाद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे, अवैध नळ जोडणीधारकांसह शक्य झाल्यास अनधिकृत बांधकामांना तीनपट दंड आकारणे आदी बाबीतून मनपाच्या उत्पन्नात वाढ करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मनपाच्या एकूण २0३ कोटींच्या उत् पन्नातून २४0 कोटींच्या खर्चाची आकडेवारी आयुक्तांनी सभागृहात सादर केली. यामध्ये वर्षाअखेरीस १५ कोटी ९४ लाखांची शिल्लक रक्कम दर्शविण्यात आली. सत्तापक्षाच्यावतीने भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी विभागनिहाय उत्पन्न व खर्चाचा आढावा घेत त्यामध्ये ८ कोटींच्या दुरुस्त्या सुचविल्या. महापौर ज्योत्स्ना गवई यांनी सर्वानुमते २४0 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली.असा येईल रुपया (वर्ष २0१४-१५)एलबीटी - ५५ कोटीमालमत्ता कर - १७ कोटी ५0 लाखपाणीपट्टी - ६ कोटीबाजार - ६0 लाखविकास शुल्क - ४ कोटीइमारत भाडे - ३५ लाखगुंठेवारीपासून उत्पन्न - ५0 लाख४अनुदाने व अंशदान - १२ कोटी १५ लाख४जमीन भाडे उत्पन्न - ३0 लाख४संकर्ण - ५६ लाखअशा आहेत तरतुदीसार्वजनिक बांधकाम विभाग - १0 कोटीविद्युत व्यवस्था - ५ कोटी ३३ लाखआरोग्य सुविधा - २२ लाखजलप्रदाय विभाग - ६ कोटीसाफसफाई - ४ कोटी ७५ लाखशिक्षण विभाग - ६५ लाखवेतनावर होणारा खर्चसार्वजनिक बांधकाम विभाग -३ कोटी २0 लाखविद्युत व्यवस्था -५ कोटी ३२ लाखआरोग्य सुविधा -१ कोटी ५0 लाखजलप्रदाय विभाग - ४ कोटीसाफसफाई -१0 कोटी ५0 लाख