शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची पुणे येथे बदली

By आशीष गावंडे | Updated: February 23, 2024 20:32 IST

अकाेलेकर नवीन आयुक्तांच्या प्रतिक्षेत

आशिष गावंडे, अकाेला: महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची राज्य शासनाने पुणे येथे बदली केली आहे. त्या पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळतील. दरम्यान, द्विवेदी यांचा बदली आदेश जारी झाल्यानंतर महापालिकेच्या रिक्त आयुक्तपदासाठी अद्यापही नियुक्ती आदेश न निघाल्यामुळे नवीन आयुक्त काेण,याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

महापालिकेच्या लाभलेल्या पहिल्या आयएएस महिला अधिकारी तत्कालीन आयुक्त निमा अराेरा यांची राज्य शासनाने अकाेला जिल्हाधिकारी पदी बदली केली हाेती. त्यादरम्यान, १६ सप्टेंबर २०२१ राेजी शासनाने मनपाच्या आयुक्तपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती केली. येत्या सप्टेंबर महिन्यात द्विवेदी यांना तीन वर्षांचा कालावधी पूर्ण हाेणार हाेता. द्विवेदी यांना मनपातील अनेेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा सामना करावा लागला. शासनाने बदली आदेश जारी केल्यानंतरही अधिकारी रूजू हाेत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा सर्व भार आयुक्त द्विवेदी यांच्यावर आल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीतही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गाडी रुळावर आणत दर महिन्याच्या ठराविक तारखेला वेतन देण्याचा निर्णय घेतला. रस्ते, नाल्या, उद्यान व इतर विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच देयक अदा करण्याच्या आयुक्तांच्या धाेरणामुळे कंत्राटदारांनी विकास कामांचा दर्जा व गुणवत्ता कायम राहील,याकडे लक्ष दिले.

आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील रिक्त पदावर तातडीने नियुक्ती करण्याच्या उद्देशातून निवडणुक आयाेगाच्या निर्देशानुसार शासनाने बदली आदेश जारी केला. -कविता द्विवेदी आयुक्त,मनपा

टॅग्स :Akolaअकोला