शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

अकोला : वाडेगाव येथील महात्मा फुले पतसंस्थेतील घोटाळ्य़ावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाडेगाव येथील महात्मा फुले बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था संचालक, व्यवस्थापक, गोदामपालाकडून ५0 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सहकार विभागाच्या तालुका उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. त्यानुसार कारवाई करण्याची मागणी माजी संचालक मनोहर सोनटक्के यांनी केली आहे. महात्मा फुले पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करत त्याची संपूर्ण चौकशी करण्याची ...

ठळक मुद्देचौकशी अहवाल संचालक, व्यवस्थापक, गोदामपालाकडून फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाडेगाव येथील महात्मा फुले बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था संचालक, व्यवस्थापक, गोदामपालाकडून ५0 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सहकार विभागाच्या तालुका उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. त्यानुसार कारवाई करण्याची मागणी माजी संचालक मनोहर सोनटक्के यांनी केली आहे. महात्मा फुले पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करत त्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी सोनटक्के यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली. त्यानुसार पतसंस्थेची चौकशी बाळापूरच्या तालुका उपनिबंधकांकडे सोपवण्यात आली. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल १८ जानेवारी २0१८ रोजी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला. त्यामध्ये पतसंस्थेचे संचालक, व्यवस्थापक, गोदामपालांनी हा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल असून, न्यायप्रविष्ट आहे. संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित झाली आहे. त्यांच्याकडून वसुली झाल्याशिवाय तक्रारकर्त्याच्या शेतमालाबाबत निर्णय घेता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. अहवालात संस्थेची फसवणूक करण्यासाठी गोदामपाल, व्यवस्थापक आणि संचालकांनी काही शेतकर्‍यांचे सात-बारा न घेताच कर्जवाटप केल्याचे दाखवले आहे. ज्यांच्या नावाने कर्ज वाटप केले, त्यामध्ये अंकुश दत्तू शहाणे-८५000, प्रकाश मारोती कचाले-१५५0२५, राजाभाऊ भीमराव काळे-५२0२५, आनंदराव काशिराम उजाडे- २१५000, ज्ञानेश्‍वर काशिनाथ म्हैसने- ८0000, १२५000, १२८0२५, १५00२५, किशोर हरिचंद्र इंगोले- ९५0२५, संजय विश्राम साबळे-६८0२५, १३५0२५, महादेव अघडते-८00२५, मुरलीधर नामदेव ढेंगे- १000२५, ५५0२५, रमेश पांडुरंग गोतमारे- ६२0२५, दिलीप गुलाब लाहोळे-५५0२५, प्रकाश प्रल्हाद लांडे- ६५0२५, ५४000, सुनील मानकर- ८00२५, ९६000, ९६000, वाघ-२४0000, ११२१३५, सुखदेव बावणे- ६0000, ४00२५, गजानन श्यामराव जुमळे-१८५000, ७0९२५, चिंतामण परसैय्या-१४00२५, किशोर कळंब- ७२000, गजानन कराळे- ४८000, नारायण बावणे-१३९१३५, प्रल्हाद भटकर- ७२५00, ८000, विद्याधर काळे-११७000, ७५000, राजाराम वाडकर-१७0000, संतोष हरिभाऊ रहाटे-९0000, मदन भास्कर जठाळ-९0000, प्रमोद मधुकर लांडे-२४00२५ एवढय़ा रकमेचा समावेश आहे. त्याचवेळी ११ कर्जदारांनी कर्जाची मागणी केली. त्यांच्या लाखो रुपये कर्जाची उचल एस.पी. बारबुदे नामक एकाच व्यक्तीने केली. त्यालाही व्यवस्थापकाने अटकाव केला नाही. त्याशिवाय, १0 व्यक्तींनी कोणत्या वाहनाने धान्य गोदामात आणले, त्या पावतीची शहानिशा न करताच त्यांना व्यवस्थापकाने कर्जवाटप केले. या प्रकरणात गोदामपाल विजय साबळे, राजेश म्हैसने यांनी व्यापारी संतोष बारबुदे याच्याशी संगनमत करून हा प्रकार केला. त्याला व्यवस्थापक, संचालक मंडळ जबाबदार नसल्याचे हास्यास्पद प्रतिज्ञापत्र एक रुपयाच्या महसुली तिकिटावर दिले, हे विशेष. 

तक्रारीतील मुद्यानुसार चौकशी करण्यासाठी बाळापूर तालुका उपनिबंधकांना जबाबदारी दिली होती. त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला. संस्थेचे कार्यक्षेत्र बाळापूर तालुका असल्याने त्यातील मुद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र तालुका उपनिबंधकांना देण्यात आले. - जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था. 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक