शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे अनेकांची कुटुंबीयांपासून ताटातूट

By atul.jaiswal | Updated: March 28, 2020 10:38 IST

अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत.

ठळक मुद्देअनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : संचारबंदीमुळे अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत. मूळ गावी परतण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळविण्यासाठी अडकून पडलेल्या विद्यार्थिनी गत चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांच्या पदरी अखेर निराशाच पडत असल्याचे वास्तव शुक्रवारी ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले.जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सगळीकडे संचारबंदी लागू करण्यात आली असून, राज्य व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. बस व रेल्वेसेवासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. अकोल्यातील काही जणांचे कुटुंब बाहेरगावी गेले आहे. तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थिनींना अकोल्यात अडकून पडावे लागले आहे. ‘शुक्रवारी लोकमत चमू’ने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली असता, काही विद्यार्थिनी, महिला व पुरुष निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या कक्षासमोर उभे असलेले दिसले. विचारणा केली असता, कोणी बाहेरगावी गेलेल्या पत्नी व मुलांना, तर कोणी बाहेरगावी शिकत असलेल्या आपल्या मुलीला आणण्यासाठी प्रशासनाकडून लिखित परवानगी घेण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. ऋतुजा गजानन वावगे नामक महिलेने सांगितले, की त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी एका क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे गेले होती. आता ती औरंगाबाद येथील वसतिगृहात एकटी असून, तिला परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे; परंतु प्रशासनाकडून चार दिवसांपासून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्धेच्या विद्यार्थिनी अडकल्या!वर्धा येथील किरण आणि काजल वासेकर या दोन विद्यार्थिनी ‘नीट’ परीक्षेच्या शिकवणी वर्गासाठी अकोला येथे आल्या होत्या. संचारबंदीमुळे शिकवणी वर्ग बंद झाले आहेत. आता त्यांना परत घरी जायचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्या येथेच अडकून पडल्या आहेत.पत्नी व मुले बाहेरगावी अडकले!रोहन वानखडे यांना माहेरी गेलेली पत्नी व मुलांना परत आणण्यसाठी यवतमाळ येथे जायचे आहे. धीरज रंगवानी यांना जळगाव येथे तर कृष्णोरकर यांना जळगाव येथे जाणे गरजेचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.कोण घेणार जबाबदारी?दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या कुटुंबातील सदस्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने अनेक जण तणावग्रस्त आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या कुटुंबीयांना खासगी वाहनाद्वारे आणण्याचीही त्यांची तयारी आहे; परंतु प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या मुलाबाळांची सुरक्षा कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला आहे.परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांना परत आणणे गरजेचे आहे. अनेकांकडून परवानगीसाठी अर्ज येत आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली असून, विभागीय आयुक्तांनी या विषयी मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. शासनाकडून परवानगी मिळाली तर प्रशासनही नक्कीच परवानगी देईल.- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अकोला.कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी बाहेर गेलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यापासून रोखणे गरजेचे आहे. आपत्कालीन वैद्यकीय कारणावरून आतापर्यंत एकालाच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. नागरिकांनी काही दिवस सहकार्य करावे. - संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस