शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा हद्दवाढीला विरोध; उद्या मोर्चा!

By admin | Updated: April 11, 2016 01:31 IST

हद्दवाढविरोधी कृती समितीचा ‘एल्गार’

अकोला: महानगरपालिका हद्दवाढीला २४ गावांचा विरोध आहे. त्यामुळे हद्दवाढ विरोधात कृती समितीने 'एल्गार' पुकारला असून, हद्दवाढीला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवार, १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मनपा हद्दवाढ कृती समितीच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. मनपा हद्दवाढीला २४ गावांचा आणि शेतकर्‍यांचा विरोध आहे. शहरात रस्ते, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्या असून, हद्दवाढीमध्ये २४ गावांचा समावेश झाल्यास ८ ते १0 टक्के कराचा बोझा ग्रामीण भागातील जनतेला सहन करावा लागणार आहे. त्यामध्ये सामान्य कर, रस्ता कर, अग्निशमन कर, शिक्षण, पाणी, साफसफाई अशा अनेक करात वाढ होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना विविध कामांसाठी दुरून येऊन मनपामध्ये चकरा माराव्या लागणार आहेत. त्यामुळे ग्रामीण, शहरी जनता व शेतकर्‍यांचा विरोध असूनही हद्दवाढीचा अट्टहास का, असा प्रश्न माजी आमदार हरिदास भदे यांनी यावेळी उपस्थित केला. शहरातील पाणी व अन्य इतर सुविधा कोणत्याही गावाला मिळत नाहीत, त्यामुळे यासंदर्भात करण्यात येणारा दावा चुकीचा असून, मनपा हद्दवाढीला विरोध दर्शविण्यासाठी कृती समितीच्यावतीने १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगितले. महसुलात वाढ करण्यासाठी मनपा हद्दवाढीचा डाव असून, करवाढीसाठी हद्दवाढीचे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव श्रीकांत पिसे पाटील यांनी यावेळी केला.