शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

अकोला : मोण्रेसाठी सरसावली मातृशक्ती; विद्यार्थिनी, महिला कर्मचार्‍यांचा सहभाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:41 IST

अकोला: शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या अभियानाला गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी शहरातील मातृशक्तीचाही हात लागला. जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थिनी, शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी, बचत गट, स्वयंसेवी संस्थांच्या महिलांनी  मोर्णा नदीकाठावर येऊन श्रमदान केले.

ठळक मुद्देमोर्णा स्वच्छतेला ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ची साथ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या अभियानाला गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी शहरातील मातृशक्तीचाही हात लागला. जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थिनी, शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी, बचत गट, स्वयंसेवी संस्थांच्या महिलांनी  मोर्णा नदीकाठावर येऊन श्रमदान केले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मोर्णा स्वच्छतेसाठी मातृशक्तीला आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत गुरुवारी सर्व मातृशक्ती मोर्णा स्वच्छतेसाठी गीता नगर येथील मोर्णा नदीच्या किनार्‍यावर पोहोचली व सर्वांनी सुमारे दोन तास श्रमदान केले.  यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, प्रेरणा राजेश खवले, नीता संजय खडसे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, ज्ञानेश्‍वरी अशोक अमानकर, राधा रामेश्‍वर पुरी, योगिता विजय लोखंडे, हर्षदा खेडकर, मनपाच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, महिला विकास आर्थिक महामंडळाच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना मेश्राम, डॉ. अनिता विधोळसह महसूल तसेच आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी तसेच  विविध महिला बचतगटांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामध्ये मनपा क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर यांच्यासह अनिता मारवाल, सुनंदा शिंदे, वेणू गायधने, इंदू एललकार, सुरेखा लहाने, शालिनी खाडे, सरस्वती पाईकराव, आशा गरड यांच्यासह जिव्हाळा, प्रीती, माँ वैष्णवी, प्रगती, शिवशक्ती, संतोषी माता, सत्यदीप, सार्थक, जय मॉ. लक्ष्मी, इच्छा, कल्पवृक्ष, स्वावलंबी महिला बचतगट, एकता, सखी, प्रज्वलीत वस्ती स्तर संघ, निर्भया व  ज्ञानज्योती वस्ती स्तर संघाच्या महिलांनी सहभाग घेतला.

या शाळांच्या विद्यार्थिनींनी नोंदविला सहभागआरडीजी महिला महाविद्यालय, मनपा हिंदी शाळा, मनपा मुलींची शाळा, मनपा उर्दू शाळा, प्रभात किड्स, मुलींचे आयटीआय, पुंडलिक बाबा विद्यालय चांदुर, श्रीमती पी.डी. पाटील समाजकार्य महाविद्यालय, महिला विकास आर्थिक महामंडळाचे विविध बचत गट यांच्यासोबत शहरातील महिला स्वयंस्फूर्तीने श्रमदानासाठी तसेच आपली मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या.

जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानापासून काढली रॅली1दर महिन्याच्या १ तारखेला जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अंतर्गत सकाळी ८.३0 वाजता जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यावरून सायकल रॅली काढण्यात आली. 2या रॅलीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, प्रेरणा राजेश खवले, नीता संजय खडसे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मुलींचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, आरडीजी महिला महाविद्यालय, पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय, शासकीय पारिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, आरोग्य विभागाच्या तसेच शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. रॅलीत सहभागी झालेल्या आरोग्य विभागाच्या चित्ररथाने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.