शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अकोला मार्गे धावणाऱ्या एलटीटी-बल्लारशाह विशेष गाडीला मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ

By atul.jaiswal | Updated: December 24, 2023 15:10 IST

Akola News: मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने अनेक साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

- अतुल जयस्वाल अकोला - मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने अनेक साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अकोला स्थानकावरून जाणाऱ्या एलटीटी-बल्लारशाह-एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीला आगामी मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, २६ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११२७ एलटीटी-बल्लारशाह विशेष गाडी आता २६ मार्च, २०२४ पर्यंत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. ही गाडी दर बुधवारी सकाळी ६:५२ वाजता अकोला स्थानकावर येऊन बल्लारशाहकडे रवाना होईल. त्याचप्रमाणे, २७ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११२८ बल्लारशाह-एलटीटी ही गाडी २७ मार्च, २०२४ पर्यंत दर बुधवारी बल्लारशाह येथून प्रस्थान करणार आहे. ही गाडी दर बुधवारी सायंकाळी ७:२७ वाजता अकोला स्थानकावर येऊन मुंबईकडे रवाना होणार आहे. ही गाडी आता पूर्वीच्या आयसीएफ काेचऐवजी २१ डब्यांच्या एलएचबी कोचसह धावणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAkolaअकोला