शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून वाढले संजय धोत्रेंचे मताधिक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 13:20 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली.

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघात उमेदवारी दाखल केल्यानंतर निर्माण झालेल्या चित्रामुळे एकतर्फी विजयाचे संकेत असताना विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या सभांमुळे प्रचारात चांगलीच रंगत आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली. त्याचा फटका काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बसला. विजयी उमेदवार संजय धोत्रे यांचे मताधिक्य कमालीचे वाढले.लोकसभा मतदारसंघातील रिसोड विधानसभा क्षेत्रात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सभा घेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर हल्ला चढविला होता. त्याच दिवशी अकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही प्रचारसभा घेतली. तेथे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यासाठी मते मागितली. त्यावेळी देश मोदी किंवा संविधानानुसार चालत नसून, ‘आरएसएस’कडून चालविला जात असल्याचे सभेत सांगितले होते.भाजपने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांच्या सभा लावल्या. लोकसभा मतदारसंघातील तीन कोपऱ्यांत या सभा झाल्या, तर त्याचवेळी काँग्रेस प्रचारातही कमी पडली. केवळ दोन सभा त्याही लगतच्या मतदारसंघात झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मतदारसंघात भेट देऊन प्रचार केल्याचे उदाहरण पुढे आले नाही.- मुख्यमंत्र्यांचा जिल्हा परिषदेवर हल्लामुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोल्यातील मैदानात सभा घेत काँग्रेसच्या उमेदवाराचा नामोल्लेख टाळला. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सत्तेने ग्रामीण विकासाचे वाटोळे केल्याचे सांगितले होते. त्यानंतर तेल्हारा येथील सभेतही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणावर टीका केली. सोबतच भाजपने देशातील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करून मोठे काम केल्याचेही सांगितले.- चव्हाणांचा धोक्याचा इशारामहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मूर्तिजापूर मतदारसंघात सभा घेतली. तेथे त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील लोकशाही धोक्यात आणली आहे. त्यांच्या सत्तेमुळे भारतीय संविधानाला धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र या धोक्याला मतदारांनी गाभिर्याने घेतले नसल्याचेच समोर आले आहे. एकूणच या सर्व सभांमुळे जिल्ह्यातील प्रचारात चांगलीच रंगत आणली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालakola-pcअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे