शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांना समर्पित - खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:27 IST

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केल्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे भाजपचे उमेदवार खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी सांगितले.

- आशिष गावंडे  पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण ठेवत विविध योजनांची पूर्तता केली. मोदींवरील दृढविश्वासामुळेच यंदा मतदारांनी आमच्या पारड्यात गतवेळीपेक्षाही अधिक मतांचे भरभरून दान दिले आहे. निवडणुकीत भाजप-शिवसेना, रिपाइंसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केल्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे भाजपचे उमेदवार खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी सांगितले.प्रश्न : यंदाच्या निवडणुकीत कशाचे आव्हान होते?उत्तर : निवडणूक कोणतीही असो, ती धैर्य आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास, निष्ठेने सामोरे जा यश तुमचेच राहील. जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालण्यापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिल्यामुळे यापूर्वीही कधी निवडणुकीत कोणाचे आव्हान नव्हते.प्रश्न : वाढीव मतदानाचा फायदा झाला असे वाटते का?उत्तर : नक्कीच फायदा झाला. यंदा १ लाख ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज रोजी सुशिक्षित युवक-युवतींना समाजहितासोबतच देशहित महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळेच वाढीव नवीन मतदारांची सर्वाधिक मते ही भाजपाच्या पारड्यात पडली आहेत.प्रश्न :कोणत्या मुद्यांना प्राधान्य देणार आहात?उत्तर : २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विकास कामांना सुरुवात झाली, हे विसरता येणार नाही. या कालावधीत जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती दिली असून, ते पूर्ण होतील, हा विश्वास आहे. येत्या काळात सिंचनासह प्रामुख्याने रस्त्यांची समस्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.प्रश्न : मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची अपेक्षा आहे का?उत्तर : मी कधीही पदाच्या लालसेने काम केले नाही. जिल्ह्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा प्रामाणिकपणे विस्तार केला. संघटन बांधणी केली. सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते जोडले. याची अनेकांना जाणीव आहे. केंद्र व राज्यात सत्ता नसतानाही जिल्हावासीयांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना सातत्याने विजयी केले. योग्यतेपेक्षा जास्त काही मिळू नये, असे मला वाटते. जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो पक्ष नेतृत्व घेईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालakola-pcअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपा