शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजपच्या संजय धोत्रेंची विजयाकडे आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 14:24 IST

Akola Lok Sabha Election Results 2019

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची घोडदौड सुरुच असून, त्यांची विजयाकडे आगेकूच सुरु आहे.दहाव्या फेरीअखेर त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अकोल्यामध्ये पहिल्या फेरीपासूनच भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे यांनी आघाडी घेतली आहे. दहाव्या फेरी अखेर त्यांना २ लाख ४००२ मतं मिळाली असून , वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात १ लाख १६ हजार ८५९ मतं पडली आहेत. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना १ लाख ५ हजार १७६भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. १९८४ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने १९८९ मध्ये विजय मिळविल्यावर काँग्रेसला उतरती कळा लागली. १९९८ व १९९९ या दोन निवडणुकीत काँग्रेसने अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीकेल्यामुळे त्याना यश मिळाले. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच काँर्ग्रेसला व अ‍ॅॅड.आंबेडकरांनाही विजय मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणात असलेलेच उमेदवार २०१९ मध्ये पुन्हा एकदा समोर आल्याने निकालाची पुनरावृत्ती होते की वंचित किंवा काँग्रेस चमत्कार करते याबद्दल उत्सुकता आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९.९८ टक्के टक्के मतदान झालंय.गेल्या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळाली होती.

टॅग्स :akola-pcअकोलाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालSanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपा