अकोला - अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण निघून जाताच तापमानात वाढ झाली आहे. अकोल्यातील तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पार गेले असून, सोमवार हा या उन्हाळ्य़ातील आतापर्यंतचा सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरला. आठवडाभरापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्याला गारद केले होते. त्यामुळे तापमानात कमालाची घट झाली होती. मंगळवार, १४ एप्रिल रोजी २९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. आठवडाभरातच पारा ४0 अंशाच्या पार केला. रविवारपासून तापमानात वाढ झाली. सोमवार या उन्हाळ्य़ातील आतापर्यंतचा सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरला. अकोला शहरातील तापमान सोमवारी ४१.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.
अकोल्याचा पारा चढला!
By admin | Updated: April 21, 2015 00:42 IST