शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला मुदतवाढ

By atul.jaiswal | Updated: August 27, 2023 15:04 IST

Akola: दक्षिण भारतातून पश्चिमेकडील राजस्थान राज्यात अकोला मार्गे जाणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस व काचीगुडा-बिकानेर या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेने घेतला आहे.

- अतुल जयस्वालअकोला - दक्षिण भारतातून पश्चिमेकडील राजस्थान राज्यात अकोला मार्गे जाणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस व काचीगुडा-बिकानेर या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेने घेतला आहे. अल्पावधितच अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या गाड्यांच्या आणखी काही फेऱ्या होणार असल्याने अकोलेकर प्रवाशांची सुविधा होणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७११५ हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष गाडी १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर शनिवारी सकाळी ५:४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७११६ जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी ३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर सोमवारी दुपारी ३:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसच्या पाच फेऱ्यागाडी क्र. ०७०५३ काचीगुडा-बिकानेर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी रात्री ९:३० वाजता काचीगुडा येथून प्रस्थान करून सोमवारी दुपारी १:५० वाजता बिकानेर स्थानकावर पोहोचणार आहे. अकोला स्थानकावर ही गाडी रविवारी सकाळी ९:२० वाजता येणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ बिकानेर-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधित दर मंगळवारी रात्री ८:१५ वाजता बिकानेर येथून रवाना होऊन गुरुवारी सकाळी ९:४० वाजता काचीगुडा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी बुधवारी रात्री ९:२५ वाजता अकोला स्थानकावर येईल. या गाडीच्या अप व डाऊन अशा पाच फेऱ्या होणार आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkolaअकोला