शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Akola: गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले

By नितिन गव्हाळे | Updated: November 1, 2023 19:09 IST

Akola News: जुने शहरात गाडगे नगरात २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील एक लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

- नितीन गव्हाळेअकोला -  जुने शहरात गाडगे नगरात २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील एक लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गाडगे नगरात राहणारे मिर्झा जहीर बैग हफीजउल्लाह बेग (वय ५५) यांच्या तक्रारीनुसार २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते पत्नीसह झोपलेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले १८ ग्रॅमची तांदूळपोथ, १० ग्रॅमचा सेव्हनपीस हार, १० ग्रॅमचे टॉप्स, ५ ग्रॅमचे कानातील झुमके, २ ग्रॅमचे सोन्याचा कैट, चांदीच्या तोरड्या, चेनपट्टी, चांदीच्या अंगठ्या असे एकूण एक लाख २१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी त्यांची पत्नी उठल्यावर तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गीता नगरातील डुप्लेक्स फोडलेगीता नगरात डुप्लेक्समध्ये राहणारे शासकीय कंत्राटदार विजय भरत उगले (वय ४०) यांच्या तक्रारीनुसार २४ ऑक्टोबर रोजी दसरा सणानिमित्त ते सिरसोली येथे गेले होते. दरम्यान, घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून चांदीच्या भांड्यासह १५ ग्रॅमची सोन्याची पोथ असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. २८ ऑक्टोबर रोजी ते घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Akolaअकोला