शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अकोला :  नवीन किराणा बाजारातून गुटख्याची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 10:37 IST

धान्याच्या ट्रकमधून गुटख्याचे पोते ने-आण करून पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूमुळे २२ मार्चपासून लॉकडाउन तसेच संचारबंदी असल्याने पाणटपऱ्या व गुटखा विक्री करणाºया किरकोळ दुकानदारांना गुटखा मिळत नसल्याने ते बंद करण्यात आली होती; मात्र आता धान्याची वाहतूक करणाºया ट्रकमधून नव्या गुटखा माफियांनी नवीन किराणा बाजारातून गुटख्याची देवाण-घेवाण सुरू केल्याची माहिती आहे. धान्याच्या ट्रकमधून गुटख्याचे पोते ने-आण करून पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.कोरोनामुळे अचानकच संचारबंदी लावण्यात आली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. यासोबतच गुटखा व पानमसाला विक्री करणाºया पानटपºया तसेच छोटी दुकानेही बंद करण्यात आल्यामुळे पानमसाला खाणाऱ्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. शहरातील गुटखा माफियांकडे असलेल्या गुटख्याची विल्हेवाट लागल्यानंतर नवीन किराणा बाजारात दोन नवे गुटखा माफिया सक्रिय झाले असून, त्यांनी या ठिकाणावरून गुटख्याची उलाढाल सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे. किराणा बाजारातून तालुक्याचे ठिकाण तसेच मोठ्या खेड्यांमध्ये धान्याची वाहतूक करणाºया ट्रकची ये-जा सुरू असल्याने याच ट्रकमधून गुटख्याची ने-आण करण्यात येत असून, शहरातही याच वाहनांनी पानटपरीचालकांना गुटखा पोहोचविण्यात येत असल्याचे वास्तव आहे.एखाद्या मुख्य चौकात किंवा निर्जनस्थळी ट्रक उभा केल्यानंतर त्या परिसरातही पाणटपरीचालकांना गुटखा देण्यात येतो. तेथून पाणटपरीचालक त्यांच्या ग्राहकांना अधिक दराने गुटखा विक्री करण्याचे काम करीत आहेत. नवीन किराणा बाजारातील या दोन गुटखा माफियांमुळे आता जिल्ह्यात गुटख्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती असून, त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या गुटखा माफियांमुळे आता धान्याची ने-आण करणाºयांनाही त्रास होणार असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे दोन गुटखा माफियांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करून त्यांना क्वारंटीन करण्याची मागणी करण्यात येत आहे.अमरावतीमधून खामगावात पोहोचला ट्रकदरम्यान सोमवारी सकाळी पोलिसांनी खामगावात एक धान्याचा ट्रक पकडल्यानंतर त्यामधील धान्याची तपासणी केली असता, या ट्रकमध्ये गुटख्याचीही पोती असल्याचे उघड झाले. अमरावती येथून आलेल्या या ट्रकमध्ये खामगावातील गुटखामाफियांचा गुटखा आणण्यात आल्याचे उघड झाले होते. यावरुन गुटखा माफियांकडून कोरोनामुळे लावण्यात आलेली संचारबंदी पायदळी तुडविण्यात येत असल्याचे वास्तव आहे.

या गुटख्याची होतेय उलाढालकाली बहार, निली बहार, नजर, विमल, रोकडा गुटखा, कर्मचंद गुटखा यासह विविध गुटख्यांची वाहतूक करण्यात येत आहे. दोन गुटखा माफियांकडून ही उलाढाल सुरु असल्याने याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

२ रुपयांची पुडी १० रुपयांनागुटख्याची मोठ्या प्रमाणात ब्लॅकने विक्री करण्यात येत आहे. २ ते ३ रुपयांची पुडी तब्बल १० रुपयांना विक्री करण्यात येत आहे. यावरुन गुटखा माफियांचे चांगलेच फावले आहे. खामगावसोबत अकोल्यातही गुटखा माफियांचा मोठा माल येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला