शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या शासकीय दूध योजनेला मिळाली १0 टन भुकटी!

By admin | Updated: January 14, 2017 00:41 IST

मागणीनंतर झाला उशिरा पुरवठा; योजनेने केला वापर सुरू

अकोला, दि. १३- राज्यातील शासकीय दूध योजनांना मागणीनुसार दूध भुकटीचा पुरवठा शासनामार्फत केल्या जातो; पण अनेक ठिकाणी उशिरा या भुकटीचा पुरवठा करण्यात आल्याने, दुधाची आवक जास्त असताना शासकीय दूध योजनांना या भुकटीचा वापर करावा लागत आहे. अकोल्याच्या शासकीय दूध योजनेलाही १0 टन भुकटी मिळाली आहे.मार्च ते ऑगस्ट या कालावधीत शासकीय दूध योजनांकडे येणार्‍या दुधाची आवक कमी असते. त्याची पूर्तता करण्यासाठी या योजनांकडून शासनाच्या दूध भुकटी प्रकल्पाकडे दूध भुकटीची मागणी नोंदविल्या जाते. ही भुकटी वापरू न नागरिकांची दुधाची मागणी पूर्ण केली जाते. अकोल्याच्या शासकीय दूध योजनेनेही मागील वर्षीच्या मार्च ते ऑगस्ट या कालावधीकरिता दूध भुकटीची मागणी नोंदविली होती; परंतु शासनाने ही भुकटी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये १0 टन जवळपास ३0 लाख रुपयांची दूध भुकटी पाठविली. ही भुकटी वापरण्याची मुदत (एक्सपायरी) जून २0१७ पर्यंत आहे. या योजनेकडे अकोला, बुलडाणा व वाशिम तीन जिल्हे मिळून जवळपास २,१00 लीटर दुधाची आवक आहे. या योजनेने गुरुवारपासून या भुकटीचा वापर दुधात सुरू केला आहे. - प्रोटीनयुक्त भुकटी!भुकटीमध्ये प्रोटीन असते. ही भुकटी वापरल्याने दुधाची घनता वाढून घट्ट होते. प्रोटीन असल्याने दुधाची प्रत चांगली होते. खासगी दूध कंपन्या दुधात घनता, यावी याकरिता इतर प्रयोग करतात; परंतु शासकीय दूध योजना प्रोटीन वावरते, हा शासकीय दूध योजनेच्या अधिकार्‍यांचा दावा आहे.- मागणी मार्चमध्ये केली असली, तरी लगेच पुरवठा होत नसतो. नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेली भुकटी वापरणे सुरू केले आहे. जूनपर्यंत ही भुकटी वापरायची आहे. शासकीय दूध योजनेच्या भुकटीमध्ये प्रोटीन असून, दुधाची घनता वाढल्याने या दुधाची वितरकामध्ये मागणी वाढली आहे. खासगी कंपन्यांच्या दुधापेक्षा योजनेच्या दुधाची प्रत सुधारली आहे.डॉ.एस.बी. दुधाने,व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, अकोला.