शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Akola: दुष्काळाच्या उंबरठ्यावर आलो तरी अतिवृष्टीची भरपाई मिळेना!

By संतोष येलकर | Updated: August 26, 2023 19:48 IST

Akola: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानीचा अहवाल पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.

- संतोष येलकरअकोला - अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानीचा अहवाल पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला; मात्र नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही.

या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदतीची रक्कम खात्यात जमा होणार तरी कधी, याबाबतची आस नुकसान झालेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना लागली आहे.यंदाच्या पावसाळ्यात गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला असून, त्यामध्ये काही भागात अतिवृष्टीदेखील झाली.तसेच नदी व नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेती आणि पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यानुसार अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १६४ कोटी १४ लाख ५० हजार ९५५ रुपये अपेक्षित मदतनिधीची मागणी गेल्या २२ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली; परंतू अद्याप नुकसानीची मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली नसल्याने, शेती आणि पीक नुकसानीची मदत खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबतची प्रतीक्षा जिल्हयातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

मदतीच्या प्रतीक्षेत तालुकानिहाय शेतकऱ्यांची अशी आहे संख्या !

तालुका            शेतकरीअकोला            ५९९८१अकोट             २४३१बाळा             ४४७८६बार्शीटाकळी ४२४६९मूर्तिजापूर १६१३३पातूर             ४४तेल्हारा          ३९६९६संकटे थांबेनात; शेतकरी पेचात !अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात गेल्या महिनाभरापूर्वी जिल्हयात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने पिके अडचणीत सापडली असतानाच वन्यप्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान आणि आता कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरु झाला. या पाश्वभूमीवर पीक नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसताना पिकांवर एका मागून एक येणारी संकटे थांबत नसल्याने, शेतकरी पेचात सापडला आहे.

टॅग्स :Akolaअकोला