शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : विकास कामांसाठी प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:00 IST

आरोग्य तपासणी करण्याची अट घालून देत आता प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने २० एप्रिलनंतर प्रलंबित विकास कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विकास कामे सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दर्शविली होती. यादरम्यान, कामावरील मजुरांची दर आठ दिवसांनी आरोग्य तपासणी करण्याची अट घालून देत आता प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता या भागातील मजुरांनीसुद्धा तूर्तास कंत्राटदारांना नकार दिल्याची माहिती आहे.कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाउन घोषित केले आहे. दरम्यानच्या कालावधीत २० एप्रिलपासून प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच महापालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांचा समावेश आहे. प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात महापालिका प्रशासनाला दिशानिर्देश प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी विकास कामे करण्याला मंजुरी दिली. शहरातील प्रलंबित रस्ते, नाल्या, नाल्यांवरील धापे, उद्यानांचे सौंदर्यीकरण, सामाजिक सभागृह आदी बांधकाम करीत असताना आपसात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी धोरण निश्चित करीत विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी कामावरील मजुरांची दर आठ दिवसांनी सक्तीने आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. तसेच शहरात कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर तूर्तास ठेवू नका, अशा सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत.

बहुतांश मजूर प्रतिबंधित क्षेत्रातीलकोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव शहरातील अकोट फैल, बैदपुरा, ताजनापेठ, मोहम्मद अली रोड, जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉट, गुलजारपुरा, वाशिम बायपास भागातील कमल नगर आदी भागात झाला आहे. नेमके याच प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर महापालिकेच्या विकास कामांवर नियुक्त केले जातात. या परिसरातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता तूर्तास प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर वगळण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.प्रलंबित विकास कामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत . यादरम्यान संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता कंत्राटदारांना व मजुरांना घ्यावी लागणार आहे.- संजय कापडणीसआयुक्त, मनपा

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका