शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला, तुला ‘पीडब्ल्यूडी’ वर भरोसा नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:23 IST

टिळक रोडवर साचले पाणी : वाहने काढताना नागरिकांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ हे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरील रेडिओ जॉकी मलिष्काचे विडंबन गीत सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. या गाण्यासारखी स्थिती अकोल्यातआहे. अकोल्यातील खोदून ठेवलेल्या टिळक मार्गावर बुधवारी रात्री आलेल्या पावसाचे पाणी साचले असून, या पाण्यातून वाट काढताना नागरिक व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) च्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यांवर जाणाऱ्या नागरिकांच्या या केवीलवाण्या स्थितीवर ‘अकोला, तुला पी डब्ल्यू डी वर भरोसा नाय काय?’ असे गाणे सहजपणे अकोलेकरांच्या ओठांवर येत आहे.शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असून, याच मालिकेत सिटी कोतवाली ते शिवाजी कॉलेजपर्यंतच्या टिळक रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर मार्ग हा राज्य महामार्गाचा भाग असल्यामुळे त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. पहिल्या टप्प्यात सिटी कोतवाली ते रयत हवेलीपर्यंतच्या रस्त्याचे सहा ते सात फुटांपर्यंत खोदकाम करण्यात आले. त्यानंतर अर्ध्यापर्यंत भराव टाकण्यात आला. रस्ता खोदलेल्या स्थितीत असतानाचा रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबांमुळे गत दोन महिन्यांपासून हे काम रखडलेले आहे. पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला नाही, त्यामुळे या खोदलेल्या रस्त्यावर पाणी साचले नव्हते. दरम्यान, बुधवारी रात्री अकोला शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या रस्त्यावर दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचले असून, रस्त्याला कालव्याचे रूप आले आहे. गुरुवारी दिवसभर या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या दुचाकी पाण्यात बंद पडल्यामुळे त्यांना भर पाण्यातून लोटत आपले वाहन बाहेर काढावे लागले. ग्राहक फिरकेना; व्यवसायांवर परिणामटिळक मार्ग हा मुख्य बाजारपेठेचा भाग असून, या मार्गावर कापडापासून ते इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची छोटी-मोठी दुकाने आहेत. रस्ता खोदलेला असल्यामुळे गत दोन ते तीन महिन्यांपासून व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दुकानांकडे नागरिक फिरकले नाहीत. त्यामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.