शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात सोमवारपासून पीक कर्ज मेळावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:34 IST

जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १५ ते ३० जुलै दरम्यान पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांच्या तक्रारींचे निवारण या पीक कर्ज मेळाव्यांमध्ये करण्यात येणार आहे.संबंधित कर्मचारी पीक कर्ज मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक तालुक्यांत १५ ते २५ गावांमध्ये पीक कर्ज मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अकोला : जिल्ह्यात सोमवार, १५ जुलैपासून तालुकानिहाय पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार असून, त्यामध्ये पीक कर्जासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १५ ते ३० जुलै दरम्यान पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत. पीक कर्ज मेळाव्यांमध्ये बँक खाते नसलेल्या शेतकºयांचे बँक खाते काढून पात्र शेतकºयांचे पीक कर्जासाठी अर्ज भरणे, पुनर्गठनासाठी पात्र व संमतीपत्र देणाºया शेतकºयांचे कर्जाचे पुनर्गठन करणे, पीक कर्जासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करणे तसेच पीक कर्जासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण या पीक कर्ज मेळाव्यांमध्ये करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये ग्रामपंचायत भवन, सेवा सहकारी सोसायटींच्या कार्यालयात पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत. संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल यांच्यासह संबंधित कर्मचारी पीक कर्ज मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, सहायक निबंधकांचे पथक पीक कर्ज मेळाव्यांना भेटी देणार आहेत. पीक कर्जासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारी व अडचणींचे निवारण पीक कर्ज मेळाव्यांमध्ये करण्यात येणार आहे. असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.पीक कर्ज मेळाव्यांचे तालुकानिहाय असे आहे नियोजन!अकोला तालुक्यात १५ व १६ जुलै, मूर्तिजापूर तालुक्यात १७ व १८ जुलै, बार्शीटाकळी तालुक्यात १९ व २० जुलै, पातूर तालुक्यात २२ व २३ जुलै, अकोट तालुक्यात २६ व २७ जुलै आणि बाळापूर तालुक्यात २९ व ३० जुलै रोजी पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत.प्रत्येक तालुक्यात १५ ते २५ गावांत मेळावे!जिल्ह्यातील सातही तालुक्यांत एकूण १४१ पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यांत १५ ते २५ गावांमध्ये पीक कर्ज मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्ज