शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याचा निकाल ८५.६९ टक्के

By admin | Updated: June 9, 2015 02:33 IST

मुलींनी पुन्हा मारली बाजी; विभागातील अव्वल स्थान गमाविले.

अकोला : बारावीपाठोपाठ दहावीतही अमरावती विभागातील अव्वल स्थान गमाविणार्‍या अकोला जिल्ह्यातील ८५.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. बाल शिवाजी हायस्कूलच्या यशपाल पाकळ आणि धनंजय सहस्त्रबुद्धेने ९९.४0 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातून ४२९ शाळांमधील २८४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८४१५ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४३४८ म्हणजे ८५.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १४७१४ मुलांपैकी ८२.७१ टक्के म्हणजे १२१७0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १३७0१ मुलींनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ८८.८८ टक्के म्हणजे १२१७८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. *मुलींमध्ये होलीक्रॉसची प्रणाली प्रथम दहावीच्या परीक्षेत मुलींमधून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रणाली अग्रवालने मिळविला. तिला ९८.६0 टक्के गुण मिळाले. तिच्यापाठोपाठ नोएल कॉन्व्हेंट स्कूलच्या पलक पुरोहितने ९८.४0 टक्के गुण मिळविले आहे.

*विभागातील अव्वल स्थान गमाविलेअमरावती विभागामध्ये गतवर्षी दहावीच्या परीक्षेत अव्वल स्थान मिळविणारा अकोला जिल्हा यावर्षी तिसर्‍या स्थानावर आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ८0.७५ टक्के गुण मिळविले होते. यावर्षी ८५.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बुलडाणा आणि वाशिमनंतर अकोला जिल्हा विभागात तिसर्‍या स्थानावर आला आहे. *बाल शिवाजीने पुन्हा मारली बाजी गतवर्षी दहावीच्या निकालात बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी खोडकुंभेने प्रथम येण्याचा मान निमळविला होता. यावर्षी पुन्हा एकदा याच शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी ९९.४0 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. बाल शिवाजी शाळेच्या यशपाल मंगलसिंग पाकळ आणि धनंजय सतीश सहस्त्रबुद्धे या दोघांनीही सर्वाधिक गुण मिळविले.