शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:22 IST

जिल्ह्यातील ५00 पैकी केवळ १९७ शाळाच लोकसहभागातून डिजिटल करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे हवा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. त्यातही अनेक शाळांमध्ये वीज नाही. ज्या शाळांमध्ये विजेची सोय आहे, त्या शाळांची वीज बिल भरण्यासारखी परिस्थिती नाही.

- नितीन गव्हाळे

अकोला: प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न केले. जिल्ह्यातील ५00 पैकी केवळ १९७ शाळाच लोकसहभागातून डिजिटल करण्यात आल्या आहेत, तर १९७ शाळांत शासनाकडून संगणक लॅब तयार करण्यात आल्या आहेत; परंतु वीज आकारणीचे भूत मानगुटीवर असल्यामुळे २५१ शाळांमध्ये संगणक लॅबच नाहीत, हे विशेष.विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे आणि शाळा संगणकीकृत व्हावी, यासाठी शासनाने डिजिटल शाळा करण्याचा उपक्रम हाती घेतला. या डिजिटल शाळांसाठी अनुदान न देता लोकसहभागातून पैसा गोळा करून गावातील शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली. शिक्षकांनी लोकसहभागातून माध्यमिकच्या १९७ शाळा डिजिटल केल्या आहेत. ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजिटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा बनविणे, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिसपॉन्सिब्लिटी), पीएसआर ( पब्लिक सोशल रिसपॉन्सिब्लिटी) अशा विविध उपक्रमातून जि.प.च्या शाळा व त्यातील विद्यार्थ्यांना हायटेक बनविण्याचे काम शासनाने सुरू केले; परंतु त्याला हवा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. त्यातही अनेक शाळांमध्ये वीज नाही. ज्या शाळांमध्ये विजेची सोय आहे, त्या शाळांची वीज बिल भरण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे अनेक शाळा डिजिटल, ई-लर्निंगपासून दूर आहेत.शासनाचा निधी नाहीशाळा डिजिटल करण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात येत नाही. लोकसहभागातून पैसा गोळा शाळा डिजिटल करण्यावर शासनाचा भर आहे. काही गावांमध्ये ग्रामस्थांनी प्रतिसाद देत, पैसा गोळा करून शाळा डिजिटल केल्या; परंतु अनेक गावांमध्ये लोकसहभागातून पैसा गोळा होत नसल्यामुळे अनेक शाळा डिजिटल होऊ शकल्या नाहीत आणि विद्यार्थीसुद्धा ई-लर्निंगपासून वंचित आहेत.लोकसहभागातून वीज बिल कसे भरावे?जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आता व्यावसायिक वीज दर आकारणी न करता घरगुती वीज दर आकारणी केली जाणार आहे. विद्युत देयकाचा भरणा शाळा अनुदान तसेच लोकवर्गणीतून करावा, अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. दरवेळेस शाळेचे वीज बिल लोकसहभागातून कसे गोळा करावेत. वीज बिलाचे पैसे मागण्यासाठी सतत लोकांकडे जाणे योग्य वाटत नसल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा