शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील विकासकामांसाठी हवे अतिरिक्त २४१ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:16 IST

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी सन २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार १२१ कोटी ९२ लाख रुपये निधीचा आराखडा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मार्फत मंजूर करण्यात आला आहे.

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी सन २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार १२१ कोटी ९२ लाख रुपये निधीचा आराखडा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मार्फत मंजूर करण्यात आला आहे. तथापि, यंत्रणांच्या मागणीनुसार विकासकामांसाठी अतिरिक्त २४१ कोटी १५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ‘डीपीसी’मार्फत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सोमवारी अमरावती येथील बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यांना मंजुरी देण्यासाठी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हानिहाय बैठका घेण्यात आल्या. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकोला जिल्हा बैठकीला अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, अपर मुख्य सचिव (नियोजन) देवाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, विभागीय उपायुक्त (नियोजन) धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार अकोला जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी १२१ कोटी ९२ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आला; मात्र विविध विकासकामांसाठी मंजूर आराखड्याव्यतिरिक्त २४१ कोटी १५ लाख ५१ हजार रुपये अतिरिक्त निधीची मागणी यंत्रणांकडून करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील विकासकामांसाठी अतिरिक्त २४१ कोटी १५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठकीत केली. या बैठकीला जिल्ह्यातील संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.विमानतळ, ग्रामीण रुग्णालयासाठी निधी द्या-आ. सावरकरअकोला विमानतळ विस्तारीकरण आणि बोरगाव मंजू येथे मंजूर करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप करण्यासाठी निधी वाढवून देण्याची मागणीही त्यांनी अर्थमंत्र्यांकडे केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार