शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात एक लाख लीटरच्यावर दुधाचा तुटवडा!

By admin | Updated: December 16, 2014 01:06 IST

पश्‍चिम महाराष्ट्र, खान्देशहून येणा-या दुधावर भिस्त.

अकोला : जिल्हय़ातील दुग्धोत्पादन घटले असून, जवळपास एक लाख लीटरच्यावर दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने पश्‍चिम महाराष्ट्र, खान्देशातून येणार्‍या दुधावर जिल्हय़ाची गरज भागविली जात आहे. खुल्या पद्धतीने दुधाची विक्री होत असल्याने नागरिकांना शुद्ध दूध मिळणे कठीणच झाले आहे.जिल्हय़ातील दूध संकलन करणार्‍या २४६ पैकी बहुतांश संस्था बंद पडल्या असून, शासकीय दूध योजनेचे दूध संकलन घटले नव्हेतर बंदच आहे. ज्या काही सहकारी दूध संस्था आहेत. त्यातील वर्तमानस्थितीत जिल्हय़ातील केवळ सात संस्थांचे दूध संकलन सुरू आहे. यामध्ये मूर्तिजापूर येथील दूध संकलन केंद्राकडून २ हजार ४५0 लीटर दुधाचा पुरवठा शासकीय दूध योजनेला केला जात आहे. आकोट येथील ३ संस्थेमार्फत प्रतिदिन एकूण ४00 लीटर दुधाचा पुरवठा होत असून, नोव्हेंबर महिन्यात शासकीय दूध योजनेला एकूण सरासरी २,४५७ लीटर दूध पुरवठा करण्यात आला आहे. वाशिम जिल्हय़ात एकूण १४ दूध संस्था कार्यरत असून, यातील एका संस्थेचा दूध पुरवठा वाशिम जिल्हा दूध उत्पादक संस्थांच्या महासंघाकडून केला जात आहे. वाशिम केंद्रावर सरासरी ४,३00 लीटर प्रतिदिन दूध पुरवठा सुरू आहे. वाशिम जिल्हय़ात एकूण १९३ सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था आहेत. यातील १४४ बंद पडल्या असून, ६७ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्या १४ संस्था सुरू आहेत. त्यामुळे अकोला आणि वाशिम या दोन जिल्हय़ातून या शासकीय योजनेला मिळणारे दूध संकलन घटले आहे.