शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अकोला जिल्ह्यात १७ हजारांवर अपंगांना योजनांचे कवच!

By admin | Updated: December 3, 2014 01:08 IST

२0११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ४६ हजार ५३५ अपंग .

संतोष येलकर/अकोलाअपंगत्वाचे प्रमाणपत्र बाळगणार्‍या जिल्ह्यातील १७ हजार ७२२ अपंग व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत योजनांचे लाभ दिला जात आहे. अपंगत्वावर मात करून, जीवनात काही तरी करण्याची जिद्द असलेल्या अपंगांना योजनांचे कवच महत्त्वपूर्ण ठरत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयामार्फत अपंग व्यक्तींना देण्यात आलेल्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे, अपंग व्यक्तींकरिता शासन आणि जिल्हा परिषद सेस फंडातून विविध योजना राबविण्यात येतात. सन २0११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ४६ हजार ५३५ अपंग बांधव आहेत. त्यामध्ये अंध,अंशत: अंध, मूकबधिर, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, मनोरुग्ण, बहुविकलांग आदी प्रवर्गातील अपंगांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ५३५ अपंग व्यक्तींपैकी ऑगस्ट २0१४ अखेरपर्यंंत अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या १७ हजार ७२२ व्यक्तींना समाजकल्याण विभागामार्फत सद्यस्थितीत शासन निधीतील योजना आणि जिल्हा परिषद सेस फंडातील वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जात आहे. अपंगत्वावर मात करुन,जीवनात काही तरी करुन दाखविण्यासाठी धडपडणार्‍या अपंगांना या योजनांचा लाभ दिला जात आहे. शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या या विविध योजना अपंगांसाठी मदतीचा आधार ठरत आहेत. तथापि, अपंगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांवर आणखी भर देण्याची गरज असून, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला प्राधान्य देण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.