शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

अकोला जिल्ह्यातील वनविभाग वार्‍यावर!

By admin | Updated: July 12, 2014 01:56 IST

राज्यातील १७ अधिकार्‍यांच्या बदल्या

अकोला: अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही.ए. धोकटे यांची बदली झाली असून, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पद एक वर्षांपासून रिक्त आहे. तसेच वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक सुटीवर आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या तीनही पदावरील अधिकारी सध्या नसल्यामुळे वनविभाग वार्‍यावर आहे.राज्यातील सतरा अधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अकोला वन विभागाचे उपवन संरक्षक व्ही. ए. धोकटे यांची पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बदली करण्यात आली आहे. धोकटे नगर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या जागेवर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नसून, त्यांचा प्रभार सध्या सहाय्यक वनसंरक्षक गोपाळे यांच्याकडे आहे. तसेच बुलडाणाचे उपवन संरक्षक डी. डी. गुजेला यांना बढती मिळाली असून, कुंडल वनविकास अकादमी सांगली येथे ते वनसंरक्षक म्हणून रुजू होणार आहेत. अकोल्यातील सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पद एक वर्षांपासून रिक्त आहे. तर येथील प्रभार अमरावती येथील अधिकार्‍यांकडे आहे. एक वर्षांपासून हे पद रिक्त असल्यामुळे अनेक उपक्रम रखडले आहेत. या पदावर कायमस्वरूपी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तसेच वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक विजय गोडबोले १ ते १५ जुलैपर्यंत सुटीवर आहेत. त्यांचा प्रभार आकोट येथील उपवन संरक्षकांकडे आहे. एकाच अधिकार्‍यांकडे दोन प्रभार असले तर दोन्हीकडील कामांवर प्रभाव पडतो. जिल्ह्यातील तीनही महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती सध्या कर्तव्यावर नाही. शासनाने जिल्ह्यातील रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींच्यावतीने करण्यात येत आहे.