शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा हद्दवाढीत २४ गावांचा समावेश

By admin | Updated: April 8, 2016 02:07 IST

गोपीकिशन बाजोरियांच्या लक्षवेधीवर रणजित पाटील यांचे उत्तर.

अकोला: महानगरपालिकेच्या हद्दीत वाढ करून, २४ गावांचा समावेश होणार आहे, असे नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत स्पष्ट केले. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.महानगरपालिका हद्दवाढीच्या मुद्यावर आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले, की अकोला महानगरपालिका परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत आहे. त्यानुषंगाने या भागासाठी सोयी-सुविधा पुरविणे, नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीत वाढ करून, परिसरातील २४ गावांचा समावेश होणार आहे. यासंदर्भात १७ मार्च २0१६ रोजीच्या राजपत्रात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रसिद्धीच्या दिनांकापासून ३0 दिवसांच्या आत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त होणार्‍या हरकती आणि सूचनांसंदर्भात विभागीय आयुक्तांनी बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात येणार असून, त्यानंतर मनपा याबाबत निर्णय घेणार आहे, असेही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. या मुद्यावर सभागृहात झालेल्या चर्चेत आ. जयंत पाटील, आ. सुनील तटकरे व आ. माणिकराव ठाकरे यांनी सहभाग घेतला.