शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : स्वस्त धान्य दुकानदारांचा सोमवारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:08 IST

अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे कार्डधारकाला आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून दुकानदारावर प्राणघातक हल्ला करून तोडफोड करण्यात आली. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक संघटनेने सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने दुकानदारांना संरक्षण देण्याची मागणीही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण राज्यभरातच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे कार्डधारकाला आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून दुकानदारावर प्राणघातक हल्ला करून तोडफोड करण्यात आली. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक संघटनेने सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने दुकानदारांना संरक्षण देण्याची मागणीही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे यांनी केली आहे.मालेगाव येथील दुकानदार गणेश तिवारी यांच्यावर हल्ला केल्याने त्यांना अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या भ्याड हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, पॉस मशीन दुरुस्त करूनच त्यावरून वाटप करण्याचा आदेश द्यावा, आधार कार्ड शंभर टक्के लिंक झाल्यानंतरच मशीनवरून वाटपाचा आदेश द्यावा, या मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रचंड त्रुटी असल्याने कार्डधारक दुकानदारांनाच लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे, वाशिम जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी आधारशिवाय धान्य देऊ नये, असा आदेश दिला आहे. त्यातून दुकानदारांवर दहशत पसरवली आहे. त्यासाठी दुकानदारांना आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. दरम्यान, जखमी दुकानदार तिवारी यांची मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. 

संपूर्ण राज्यभरातच दुकाने बंदसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख, खासदार गजानन बाबर यांनी संपूर्ण राज्यभरातील दुकाने १५ जानेवारी रोजी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून एकजुटीने लढा द्यावा, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या घटना घडू नयेत, तसेच पॉस मशीनने धान्य देणे बंद करावे, यासाठी निवेदन दिले जाणार आहे. त्यासाठी दुकानदारांनी सोमवारी दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष मुंडे यांच्यासह शहर अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी केले आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर