शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहर बनतेय पिस्तूल तस्करीचे केंद्र

By admin | Updated: November 6, 2014 01:08 IST

गुंड प्रवृत्तीच्या युवकांना देशीकट्टा, पिस्तूलचे आकर्षण.

अकोला : समाजात वावरताना इतरांवर दहशत निर्माण करण्यासाठी, रुबाब वाढविण्यासाठी कमरेवर लावलेली पिस्तूल, देशीकट्टा दाखवत फिरणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. गत दोन महिन्यांमध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये ८ पिस्तूल व १६ जिवंत काडतूस जप्त केले. यावरून गुंड युवक व त्यांच्या टोळय़ांमध्ये देशीकट्टा व पिस्तूलचे आकर्षण वाढत असल्याचे सिद्ध होत आहे. गत काही महिन्यांमध्ये शहराध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, कट्टे मिळाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, शहर पिस्तूल तस्करीचे केंद्र बनत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये धारदार शस्त्रांचा वापर केला जात होता; परंतु गत दोन ते तीन वर्षांपासून गुंडाकडून धारदार शस्त्रांसोबतच देशीकट्टा व पिस्तूलचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे शहरात झालेल्या घटनांवरून स्पष्ट झाले. २00९ मध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादामध्ये देशी पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर २0११ मध्ये आकोट फैलामध्ये दोन गटात झालेल्या सशस्त्र संघर्षामध्ये सुद्धा पिस्तूलचा वापर करण्यात आला होता. शहरामध्ये देशीकट्टा, पिस्तूलची खरेदी व विक्रीसुद्धा होत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले. मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड राज्यांमध्ये जाऊन काही गुंड प्रवृत्तीचे युवक देशीकट्टे व पिस्तूल, जिवंत काडतूस ५ ते १0 हजार रुपयांमध्ये शहरात आणून त्याची विक्री करतात. महिनाभरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी छापे घालून ११ आरोपींकडून ८ पिस्तूल व १६ जिवंत काडतूस जप्त केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून आरोपींनी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून शहरात विक्री केल्याचेही समोर आले होते.