अकोला- यंदाच्या पावसाळ्य़ात मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अकोलेकरांची प्रतीक्षा या आठवड्यात संपली. मंगळवारी दिवसभर अधुनमधून मुसळधार पाऊस कोसळल्याने अकोला चिंब झाले. या पावसाने अकोला शहरातील रस्ते मात्र तुडुंब भरल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. जिल्हय़ातील धरणक्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाची पातळीत मंगळवारी वाढ झाली. काटेपूर्णा प्रकल्पात सायंकाळी ५ वाजेपर्यंत २६.५१ टक्के जलसाठा झाला होता. सोमवारच्या तुलनेत पाण्याची पातळी ७ टक्कय़ांनी वाढली आहे. अकोला शहरात रात्री ८.३0 वाजेपर्यंत संपलेल्या बारा तासामध्ये २0.४ मि.मी. पाऊस झाला होता. चार दिवसांपासून पश्चिम विदर्भात पाऊस सुरू असून, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ व बुलडाणा या जिल्हय़ातील धरणांतील जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे. अकोला जिल्हय़ातील धरणांच्या जलपातळीत अद्याप अपेक्षित वाढ झाली नसल्याने या अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. वाशिम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा धरणात मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २६.५१ टक्के जलसाठा झाला आहे. मोर्णा, निगरुणा व उमा या मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ३८.८१, ७४ व १६.२७ टक्के अशी जलसाठय़ात वाढ झाली आहे. पोपटखेड या लघू प्रकल्पात ९१ टक्के तर वाण या सिंचन प्रकल्पाचा जलसाठा ८७ टक्के आहे. *अकोला शहरात १२ तासात २0 मि.मी. पाऊस४अकोला शहरामध्ये मंगळवारी सकाळी ८.३0 वाजतापासून ते रात्री ८.३0 वाजतापर्यंत २0.४ मिलीमीटर पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्य़ात प्रथमच मुसळधार पाऊस अकोलेकरांना बघावयास मिळाला. *जिल्हय़ात सरासरी ६ मिमी पावसाची नोंद४गेल्या चोवीस तासात २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत जिल्हय़ात ६ मिमी पावसाची नोंद स्थानिक हवामान विभागाने केली आहे. यामध्ये सर्वाधिक पातूर तालुक्यात ३८ मिमी पाऊस झाला असून, बाश्रीटाकळी तालुक्यात १८ मिमी बाळापूर १७ मिमी मूर्तिजापूर १0 मिमी, तर तेल्हारा तालुक्यात केवळ २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आकोट तालुक्यात सकाळी ८ वाजतापर्यंत शून्य मिमी पावसाची नोंद होती. जिल्हय़ात हा पाऊस सरासरी ६ मिमी नोंदविण्यात आला आहे.
अकोला चिंब, रस्ते तुडुंब
By admin | Updated: September 3, 2014 01:11 IST