शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अतिक्रमकांसमाेर महापालिकेचे लाेटांगण; दुसऱ्यांदा दिली मुदत, २१ ऑगस्ट पासून माेहीमेला करणार प्रारंभ

By आशीष गावंडे | Updated: August 19, 2023 19:54 IST

Akola: शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत.

- आशिष गावंडे अकोला - शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण माेहीम सुरु करण्याचा गवगवा करणाऱ्या मनपा प्रशासनाने आता नागरिकांना स्वत:हून अतिक्रमण हटविण्यासाठी दुसऱ्यांदा मुदत दिली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वैतागलेल्या अकाेलेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यांलगत रेडीमेड ड्रेस विक्रेता, खाद्यपदार्थ विक्रेता,भाजीपाला व्यावसायिक व इतर किरकाेळ साहित्य विक्री करणाऱ्या लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांनी अक्षरश: बाजार मांडला आहे. यामुळे चारचाकी व दुचाकी चालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असून पादचारी अकाेलेकरांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या समस्येवर प्रभावी ताेडगा काढण्याची गरज असताना महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. कंत्राटदारांची देयके तातडीने अदा करणाऱ्या प्रशासनाकडून विकास कामांची पाहणी केली जाते. दुसरीकडे अतिक्रमणाच्या समस्येचा नागरिकांना वैताग आला असताना कारवाइसाठी वरिष्ठ अधिकारी दालनात बसणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे. अर्थात, सर्वसामान्यांना टॅक्सचा भरणा करण्यासाठी आग्रही असणारे प्रशासन अतिक्रमणाच्या मुद्यावर संभ्रमावस्थेत असल्यामुळे नागरिका तिव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

२१ ऑगस्ट पासून कारवाइला सुरुवातलघू व्यावसायिक, फेरीवाले व दुकान व्यावसायिकांनी उभारलेले अतिक्रमण स्वत:हून न हटविल्यास मनपा प्रशासनाकडून २१ ऑगस्ट पासून अतिक्रमण हटविण्याची कारवाइ केली जाणार आहे. यामध्ये पूर्व, पश्चिम, आणि उत्‍तर झोन अंतर्गत अशोक वाटीका ते पीकेव्‍ही पुल पर्यंत, नेहरू पार्क ते दुर्गाचौक, पोस्‍ट ऑफीस ते सुधीर कॉलनी पर्यंत, सिटी कोतवाली ते जयहिंद चौक ते किल्‍ला चौक ते वाशिम बायपास, आकोट फैल परिसर, साधना चौक तसेच पालखी मार्गापर्यंतच्‍या अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे.

सणासुदीच्या नावाखाली अतिक्रमकांना अभयसणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल राहते. यामुळे उद्याेग,व्यवसायाला चालना मिळत असल्याचा युक्तीवाद लघू व्यावसायिक व फेरीवाले करतात. त्यांची पाठराखण करण्यासाठी राजकीय पुढारीही समाेर येतात. परिणामी सणासुदीच्या नावाखाली अतिक्रमकांना अभय मिळत असले तरी रस्त्यातून वाट काढताना अकाेलेकरांच्या नाकीनऊ येत आहेत.

टॅग्स :Akolaअकोला