शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

कोरोनाचा आणखी एक बळी; ५१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:39 IST

CoronaVirus in Akola आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २६४ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. शनिवार, १७ आॅक्टोबर रोजी आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २६४ झाली आहे. दरम्यान, ५१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८०३४ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील वारखेड येथील आठ, मूर्तिजापूर, मलकापूर व गायगोळे प्लॉट येथील प्रत्येकी पाच, जीएमसी येथील तीन, तेल्हारा, बाळापूर, जीएमसी हॉस्टेल व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, समर्थ नगर, हिवरखेड, देशमुख फाईल, खडकी, पातूर, आदर्श कॉलनी, प्रतापनगर, संतोष नगर, रतनलाल प्लॉट, विद्युत कॉलनी, मोठी उमरी, व्यंकटेश नगर, रमेश नगर, शिवाजी नगर, डाबकी रोड, खदान व लेडी हार्डिंग येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.मलकापूरातील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यूशनिवारी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण व्हीएचबी कॉलनी, मलकापूर येथील ७२ वर्षीय पुरुष असून, त्यांना १६ आॅक्टोंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.४७० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,०३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४७० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला