शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय क्रीडास्पर्धेत अकोला व यवतमाळ संघाचे दमदार प्रदर्शन

By admin | Updated: January 17, 2015 00:03 IST

अमरावती विभागीय जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा.

अकोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे अमरावती विभागीय जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी यजमान अकोला संघाने दमदार खेळ प्रदर्शन करीत वर्चस्व कायम राखले. त्यापाठोपाठ यवतमाळ संघाने आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.वैयक्तिक व सांघिक दोन्ही क्रीडाप्रकारांमध्ये अकोला व यवतमाळने सुंदर खेळप्रदर्शन केले. पुरुषांच्या गटात कबड्डी स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात बुलडाणा संघाला अमरावती संघाने पराभूत केले. दुसर्‍या सामन्यात यवतमाळ संघाने अकोलावर विजय मिळविला. महिला गटात अकोला संघाने वाशिमवर मात केली. खो-खो स्पर्धेत महिला गटात अकोला संघाने बुलडाणा संघाचा पराभव केला. व्हॉलीबॉल (स्ट्रोक) उपांत्य सामन्यात अकोला संघाने अमरावतीला पराभूत केले, तर दुसर्‍या सामन्यात बुलडाणा संघाने वाशिमला पराभूत करून अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. कॅरममध्ये पुरुष गटात अकोला व यवतमाळच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. महिला गटात अकोला व बुलडाणाच्या खेळाडू अव्वल ठरल्या. कॅरम दुहेरीमध्ये पुरुष विभागात वाशिम व यवतमाळ आणि महिला विभागात अमरावती व बुलडाणा संघाच्या कॅरमपटूंमध्ये विजेतेपदाची चढाओढ लागली. टेबल-टेनिसमध्ये पुरुषांच्या गटात यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला एकेरीत आणि दुहेरीमध्ये वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती संघाचे खेळाडूंनी विविध गटांत विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल झाले. महिला गटात यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती संघाच्या खेळाडू आघाडीवर आहेत. बुद्धिबळमध्ये बुलडाणा, वाशिम, अकोला संघाने अंतिम फेरी गाठली.