शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Akola: ...अन् अचानक घरच हलल्यासारखे वाटले, अकोल्यात सौम्य भूकंप,  नागरिकांना जाणवले धक्के

By atul.jaiswal | Updated: July 10, 2024 19:30 IST

Akola News: बुधवारी सकाळची वेळ...कुणी चहा पित होते, कुणी पेपर वाचत होते, तर कुणी मुलांना शाळेत घेऊन जाण्याच्या तयारीत होते...अशी दिनचर्या सुरू असतानाच अचानक सात-सव्वा सात वाजताचे सुमारास काही जणांना आपले घर किंचितसे हलल्याची जाणीव झाली.

- अतुल जयस्वालअकोला - बुधवारी सकाळची वेळ...कुणी चहा पित होते, कुणी पेपर वाचत होते, तर कुणी मुलांना शाळेत घेऊन जाण्याच्या तयारीत होते...अशी दिनचर्या सुरू असतानाच अचानक सात-सव्वा सात वाजताचे सुमारास काही जणांना आपले घर किंचितसे हलल्याची जाणीव झाली. अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आणि सर्वांनीच मग आपल्यालाही धक्के जाणवल्याचे इतरांना सांगितले व संपूर्ण शहरभर भूकंपाची चर्चा सुरू झाली.

बुधवार, १० जुलै रोजी सकाळी ७:१५ वाजता नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तिथे भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली असली तरी अकोल्यात अगदी सौम्य प्रमाणात धक्के जाणवले. तज्ज्ञांचे मते ही तीव्रता एक ते दीड रिश्टर स्केलपेक्षाही कमी असावी. अकोला शहरातील जुने शहर, शिवणी, रणपिसेनगर, खेडकर नगर, सुधीर काॅलनी, सावंतवाडी, गंगानगर आदी भागांतील नागरिकांना जमीन हादरल्याचा अनुभव आला. बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा प्रकल्प परिसरातील महानसह अनेक गावांत भूकंपाच्या सौम्य धक्क्याचा अनुभव आल्याचे नागरिकांनी सांगितले.

उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना जाणवले धक्केअकोला शहरातील विविध भाग व जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला. तीव्रता अत्यंत कमी असल्याने सर्वांनाच भूकंपाचे धक्के जाणवले नाही. शहरातील अपार्टमेंटमध्ये तळ मजल्याच्या तुलनेत वरच्या मजल्यांवर राहणाऱ्यांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरिक सांगतात.

यापूर्वीही जाणवले धक्केअकोल्यात भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. शहरासह जिल्ह्यात यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. २७ मार्च २०२४ रोजी बाळापूर तालुक्यातील अंतरी मलकापूर येथे भूकंपाचा धक्का बसला होता. त्यापूर्वी वर्ष २०२३ मध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. वर्ष २०२० मध्येही जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता.

सकाळी मुलीच्या शाळेची तयारी करत असताना अचानक संपूर्ण फ्लॅट किंचितसा हलल्याची जाणीव झाली. शेजारी विचारले असता त्यांनीही असाच अनुभव आल्याचे सांगितले. त्यामुळे थोडी भीती वाटली होती.- शीतल ठाकरे, अकोला

आम्ही चौथ्या मजल्यावर राहतो. सकाळी दैनंदिन कामात असताना अचानक हलल्यासारखे वाटले. बाहेर पडून शेजाऱ्यांना विचारले असता त्यांनाही असाच अनुभव आल्याचे सांगितले. नंतर हा भूकंपाचा धक्का होता हे समजले.- ॲड. वैशाली भोरे, अकोला

भूगर्भातील हालचालींचा हा परिणाम आहे. अलीकडच्या काळात वाढलेल्या उत्खननामुळे भूगर्भात पोकळी निर्माण झाल्याने टेक्टॉनिक प्लेटच्या हालचाली वाढल्या आहेत. आपला भाग हा मुळीच भूकंप प्रवण नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.- प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला

टॅग्स :EarthquakeभूकंपAkolaअकोला