शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अकोला-अकोट पॅसेंजर मार्गस्थ, रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली हिरवी झेंडी

By atul.jaiswal | Updated: November 23, 2022 13:22 IST

Akola-Akot Railway: गत अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली अकोला ते अकोट पॅसेंजर रेल्वे बुधवार, २३ जून रोजी अकोला स्थानकावरून रवाना झाली. 

- अतुल जयस्वाल अकोला : गत अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली अकोला ते अकोट पॅसेंजर रेल्वे बुधवार, २३ जून रोजी अकोला स्थानकावरून रवाना झाली. दक्षीण मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्र. सहा येथे बुधवारी सकाळी ११ वाजता रेल्वेचा उद्घाटन सोहळा पार पडला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने ०७७१८ अकोला-अकोट पॅसेंजरला हिरवी झेंडी दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, विधान परिषद सदस्य आमदार डॉ. रणजित पाटील, रणधीर सावरकर,  आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चन मसने, नारायणराव गव्हाणकर उपस्थित होते. मान्यवरांनी रेल्वेस्थानकावर हिरवी झेंडी दिल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता रेल्वे अकोटकडे मार्गस्थ झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उगवा, गांधी स्मारक रोड व पाटसुल या स्थानकांवर रेल्वेचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी अनेक प्रवाशांनी अकोटपर्यंतचा प्रवास केला.

गुरुवारी (दि.२४)पासून ही गाडी रोज सकाळी ७ वाजता अकोला येथून रवाना होऊन सकाळी ८.२० वाजता अकोट स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात हीच गाडी अकोट येथून ९ वाजता रवाना होऊन, अकोला येथे १०.२० वाजता येणार आहे. दिवसभर येथे थांबल्यानंतर ही गाडी सायंकाळी ६ वाजता अकोला येथून रवाना होऊन सायंकाळी ७.२० वाजता अकोट स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी तिकडून रात्री आठ वाजता रवाना होऊन रात्री ९.२० वाजता अकोला स्थानकावर परत येईल. या गाडीला उगवा, गांधी स्मारक रोड व पाटसुल या स्थानकांवर थांबा असणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkolaअकोला